रिध्दिमा तिवारी महिलांना देतेय 'हा' सल्ला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2017 15:38 IST2017-05-27T10:08:26+5:302017-05-27T15:38:26+5:30

‘गुलाम’ मालिकेतील आपल्या माल्दावालीच्या भूमिकेमुळे चर्चेत असलेली देखणी अभिनेत्री रिध्दिमा तिवारी आता लैंगिक अत्याचार किंवा गैरवर्तणुकीच्या बळी ठरलेल्या महिलांना ...

Riddima Tiwari is giving advice to women! | रिध्दिमा तिवारी महिलांना देतेय 'हा' सल्ला !

रिध्दिमा तिवारी महिलांना देतेय 'हा' सल्ला !

ुलाम’ मालिकेतील आपल्या माल्दावालीच्या भूमिकेमुळे चर्चेत असलेली देखणी अभिनेत्री रिध्दिमा तिवारी आता लैंगिक अत्याचार किंवा गैरवर्तणुकीच्या बळी ठरलेल्या महिलांना सल्ला देणार आहे.‘गुलाम’ मालिकेतील आपल्या नकारात्मक भूमिकेमुळे जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली रिध्दिमा तिवारी ही महिलांवरील अत्याचारांविरोधात गप्प बसू शकत नाही. त्यामुळे विविध अत्याचारांना बळी पडलेल्या महिलांना ती सल्ला पुरविणार आहे. हुंडा, घरगुती हिंसाचार, वैवाहिक वाद, मालमत्तेचे वाद आणि नोकरीच्या ठिकाणी होणारी लैंगिक सतावणूक यासारख्या अत्याचारांना बळी पडलेल्या महिलांसाठी ती कार्यशाळा घेणार असून त्यांना कायदेशीर सल्लाही पुरविणार आहे.तिच्या या उपक्रमाबद्दल तिला विचारले असता ही  अभिनेत्री म्हणाली, “अशा अत्याचारांना बळी पडलेल्या महिलांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी मी कार्यशाळांचं आयोजन करणार आहे. यामुळे त्यांचं आयुष्य बदलून जाईल. ज्या  महिलांना असा त्रास सहन करावा लागतो, त्यांना त्यांची बाजू लक्षात घेणारं कोणीतरी विश्वासाचं माणूस हवं असतं.मला ती विश्वासू व्यक्ती होण्यास नक्कीच आवडेल. ज्या महिलांना कायदेशीर सल्ला देऊन त्यांच्यात पुन्हा आत्मविश्वास निर्माण करणार्‍या एका एनजीओबरोबरही मी काम करणार आहे.”
‘बहु हमारी रजनीकांत’ या मालिकेतून रिद्धिमा घराघरात पोहोचलेली आहे. बहू हमारी रजनीकांत या मालिकेमुळे रिद्धिमाला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या. ती सलमान खानची मोठी फॅन आहे. रिद्धिमाची सलमानसोबत काम करण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितले होते. बहू हमारी रजनीकांत या मालिकेत वेगवेगळ्या भूमिकेत दिसली होती. 

Web Title: Riddima Tiwari is giving advice to women!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.