अंगठी छोटी पण किंमत मोठी! समांथाच्या वेडिंग रिंगची किंमत ऐकून थक्कच व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 13:59 IST2025-12-02T13:55:56+5:302025-12-02T13:59:38+5:30
समांथाने लग्नात घातलेल्या अंगठीची किंमत समोर आली आहे. त्याबद्दल जाणून घेऊन तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. जाणून घ्या

अंगठी छोटी पण किंमत मोठी! समांथाच्या वेडिंग रिंगची किंमत ऐकून थक्कच व्हाल
अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि चित्रपट निर्माता-दिग्दर्शक राज निदिमोरु यांचं नुकतंच तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील एका मंदिरात लग्न झालं. या विवाहसोहळ्याचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये समांथाचा ब्रायडल लूक जितका चर्चेत आहे, त्याहून अधिक लक्ष वेधून घेतले आहे, तिच्या वेडिंग रिंगने. अंगठीची खास आणि युनिक डिझाइन सध्या विशेष चर्चेचा विषय बनली आहे. या अंगठीची किंमत वाचून थक्कच व्हाल
समांथाच्या अंगठीची किंमत किती?
समांथाने पारंपरिक डायमंड रिंगऐवजी, एक अत्यंत खास आणि लक्षवेधी डिझाइनची अंगठी लग्नात परिधान केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, ही रिंग 'लोझेंज पोर्ट्रेट कट डायमंड्स' (Lozenge Portrait Cut Diamonds) पासून बनलेली आहे. या अंगठीच्या मध्यभागी अंदाजे २ कॅरेटचा 'लोझेंज पोर्ट्रेट कट' हिरा आहे आणि त्याच्याभोवती ८ डायमंड्स पाकळ्या आकारात अत्यंत नाजूकपणे जोडलेल्या आहेत.
ही अंगठी एका सुंदर नक्षीकामाचा नमुना आहे. हा पोर्ट्रेट कट हिरा अतिशय पातळ आणि सपाट असतो, ज्याला न तोडता मोठ्या काळजीने कापावे लागते. त्यामुळे ही अंगठी खास कस्टम डिझाइन म्हणून तयार करण्यात आली आहे. समांथाच्या या अंगठीची किंमत सुमारे १.५ कोटी रुपये इतकी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही खास रिंग राजने समांथाला दिलेली अत्यंत सुंदर भेट आहे. यामुळे समांथाच्या फॅशन सेन्सचं कौतुक होतंय. समांथाचं लग्न झाल्यावर चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.