Bigg Boss नंतर 'महाराष्ट्रीयन भाऊ'ची थेट 'खतरों के खिलाडी १५'मध्ये एन्ट्री? प्रणित मोरे म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 15:31 IST2025-12-09T15:29:53+5:302025-12-09T15:31:34+5:30
'खतरों के खिलाड़ी १५'मध्ये प्रणित मोरेची एन्ट्री? 'बिग बॉस'नंतर दिले मोठे संकेत

Bigg Boss नंतर 'महाराष्ट्रीयन भाऊ'ची थेट 'खतरों के खिलाडी १५'मध्ये एन्ट्री? प्रणित मोरे म्हणाला...
'बिग बॉस १९'ची ट्रॉफी टेलिव्हिजनचा सुपरस्टार गौरव खन्नानं जिंकली.आहे. तर फरहाना भट्ट ही उपविजेती ठरली. अख्ख्या देशाचा लाडका 'महाराष्ट्रीयन भाऊ' प्रणीत मोरे तिसऱ्या नंबरवर एलिमिनेट झाला. "बिग बॉस १९" मधून बाहेर पडल्यानंतर अनेक स्पर्धकांनी त्यांच्या पुढील प्लॅनचा खुलासा केला आहे. 'बिग बॉस १९' च्या टॉप ३ मध्ये पोहोचलेला प्रणित मोरे आता लवकरच रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी १५' मध्ये दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
'न्यूज १८' शी बोलताना प्रणित मोरेला विचारण्यात आले की तो 'खतरों के खिलाडी १५' मध्ये दिसणार का? यावर त्याने अत्यंत स्पष्ट उत्तर दिले. तो म्हणाला, "बिग बॉस हा शो माझ्यासाठी खूप मानसिक आणि भावनिकरित्या कठीण होता, त्यामुळे बिग बॉसच्या फॉरमॅटमध्ये परतण्याचा माझा कोणताही विचार नाही. पण जर एखादा वेगळ्या संकल्पनेचा, मनोरंजक शोची ऑफर आली तर मी नक्कीच त्याचा विचार करेन". अर्थात संधी मिळाल्यास प्रणित 'खतरों के खिलाडी १५' मध्ये नक्कीच सहभागी होऊ इच्छितो. मात्र, सध्या आपली प्राथमिकता स्टँड-अप कॉमेडी असल्याचे त्याने स्पष्ट केले.
प्रणित मोरेसोबत तान्या मित्तल आणि फराहना भटदेखील ''खतरों के खिलाडी १५'चे संभाव्य स्पर्धक आहेत. कारण 'बिग बॉस १९'मध्ये असतानाच त्यांनी रोहित शेट्टी यांच्या शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान, दरवर्षी 'खतरों के खिलाडी'चे निर्माते 'बिग बॉस'मधील स्पर्धकांना शोसाठी संपर्क साधतात. 'खतरों के खिलाडी' शोची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. आतापर्यंत रोहित शेट्टीच्या या रिअॅलिटी शोचे तब्बल १४ पर्व यशस्वी पूर्ण झालेत. आता लवकरच 'खतरों के खिलाडी' चं १५वं पर्व येणार आहे.