Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Marriage: सध्या मराठी मनोरंजनविश्वास सनई चौघडे वाजत आहेत. आजच सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांनी लग्नगाठ बांधली. तर आता 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड खुटवड घराण्याची सून झाली आहे. तिला खऱ्या आयुष्यातही शंभुराज मिळाले आहेत. प्राजक्ता आणि शंभुराज यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्राजक्ता गायकवाडने लग्नात हिरव्या रंगाची नऊवारी नेसली होती. त्यावर भरजरी सोन्याचे दागिने, नथ, मुंडावळ्या अशा नव्या नवरीचा सुंदर लूक आहे. तर शंभुराने गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केली आहे. तसंच डोक्यावर फेटा बांधला आहे. त्यांच्या लग्नाचा अगदी राजेशाही थाट दिसत आहे. पुण्यात त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला. नवऱ्याचा कानपिळीचा व्हिडीओ ही समोर आला आहे. तसंच प्राजक्ताला मंगळसूत्र घालतानाचाही व्हिडीओ व्हायरल होत आहे.
प्राजक्ता गायकवाडचे अनेक चाहते आहेत. इंडस्ट्रीतून आणि चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. टीव्हीवरची लाडकी येसूबाई आता खुटवड कुटुंबाची सून झाली आहे. प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती 'आई माझी काळूबाई', 'स्वराज्यरक्षक संभाजी' अशा मालिकांमध्ये दिसली. नुकताच तिचा 'स्मार्ट सूनबाई'हा सिनेमाही रिलीज झाला. तर शंभुराज खुटवडचा बिझनेसमन आहे.
Web Summary : Actress Prajakta Gaikwad, known for 'Swarajyarakshak Sambhaji,' married businessman Shambhuraj Khutwad in Pune. The wedding, a traditional Maharashtrian affair, saw Prajakta in a green Navvari saree and Shambhuraj in a pink sherwani. Photos and videos of the royal-themed wedding are viral. The actress was previously seen in 'Aai Mazi Kalubai' and 'Smart Sunbai'.
Web Summary : 'स्वराज्यरक्षक संभाजी' से मशहूर अभिनेत्री पराजक्ता गायकवाड़ ने पुणे में व्यवसायी शंभूराज खुटवड से शादी कर ली। पारंपरिक महाराष्ट्रीयन अंदाज में हुई शादी में पराजक्ता ने हरी नववारी साड़ी और शंभूराज ने गुलाबी शेरवानी पहनी थी। शाही थीम वाली शादी की तस्वीरें और वीडियो वायरल हो रहे हैं। अभिनेत्री को पहले 'आई माझी कालुबाई' और 'स्मार्ट सूनबाई' में देखा गया था।