Prajakta Gaikwad Wedding: खुटवड कुटुंबाची सून झाली प्राजक्ता गायकवाड, खऱ्या आयुष्यातही शंभुराजांशी बांधली लग्नगाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 15:25 IST2025-12-02T15:24:15+5:302025-12-02T15:25:22+5:30
Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Wedding: प्राजक्ता गायकवाड-शंभुराज यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल, पुण्यात पार पडला शाही विवाहसोहळा

Prajakta Gaikwad Wedding: खुटवड कुटुंबाची सून झाली प्राजक्ता गायकवाड, खऱ्या आयुष्यातही शंभुराजांशी बांधली लग्नगाठ
Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Marriage: सध्या मराठी मनोरंजनविश्वास सनई चौघडे वाजत आहेत. आजच सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांनी लग्नगाठ बांधली. तर आता 'स्वराज्यरक्षक संभाजी' अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड खुटवड घराण्याची सून झाली आहे. तिला खऱ्या आयुष्यातही शंभुराज मिळाले आहेत. प्राजक्ता आणि शंभुराज यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्राजक्ता गायकवाडने लग्नात हिरव्या रंगाची नऊवारी नेसली होती. त्यावर भरजरी सोन्याचे दागिने, नथ, मुंडावळ्या अशा नव्या नवरीचा सुंदर लूक आहे. तर शंभुराने गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केली आहे. तसंच डोक्यावर फेटा बांधला आहे. त्यांच्या लग्नाचा अगदी राजेशाही थाट दिसत आहे. पुण्यात त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला. नवऱ्याचा कानपिळीचा व्हिडीओ ही समोर आला आहे. तसंच प्राजक्ताला मंगळसूत्र घालतानाचाही व्हिडीओ व्हायरल होत आहे.

प्राजक्ता गायकवाडचे अनेक चाहते आहेत. इंडस्ट्रीतून आणि चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. टीव्हीवरची लाडकी येसूबाई आता खुटवड कुटुंबाची सून झाली आहे. प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती 'आई माझी काळूबाई', 'स्वराज्यरक्षक संभाजी' अशा मालिकांमध्ये दिसली. नुकताच तिचा 'स्मार्ट सूनबाई'हा सिनेमाही रिलीज झाला. तर शंभुराज खुटवडचा बिझनेसमन आहे.