गेल्या काही दिवसांपासून सर्वांना एका लग्नाची उत्सुकता होती ते म्हणजे अभिनेत्री पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर. अखेर हे दोघेही कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींच्या खास उपस्थितीत शाही थाटात पूजा आणि सोहम बांदेकरचं लग्न संपन्न झालंय. लग्नमंडपात पूजाने घेतलेली खास एन्ट्री सर्वांचं लक्ष वेधून गेली.
पूजा-सोहमच्या लग्नाची चर्चा
पूजा आणि सोहमच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत पूजाने खास अंदाजात लग्नमंडपात एन्ट्री घेतलेली दिसली. सर्वांनी टाळ्या वाजवून पुजाचं स्वागत केलं. लग्नाच्या आधी ती सोहमकडे पाहून हसताना दिसली. पुढे लग्नात उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. त्यानंतर विधीवत सोहम आणि पूजा लग्नबंधनात अडकले. दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केलाय. पूजाने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती तर सोहमने आकर्षक डिझाईन असलेला कुर्ता घातला होता.
सोहम हा अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा आहे. तर पूजा ही टीव्ही अभिनेत्री आहे. या दोघांनी आयुष्यभराची गाठ बांधली आहे. कालच दोघांची हळद उत्साहात झाली. तर रात्री संगीत फंक्शनही जल्लोषात पार पडलं. या दोघांचं लग्न मुंबई नाही तर लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये पार पडलं. या लग्नाला अनेक मराठी कलाकारांची उपस्थिती होती. दरम्यान काल हळद आणि संगीत फंक्शनमध्ये पूजा आणि सोहमने चांगलीच धमाल केली. नवरीचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Web Summary : Pooja Birari and Soham Bandekar married in a lavish ceremony attended by family and friends. The wedding, held in Lonavala, featured a grand entry by Pooja and pre-wedding festivities like haldi and sangeet.
Web Summary : पूजा बिरारी और सोहम बांदेकर ने परिवार और दोस्तों की मौजूदगी में धूमधाम से शादी कर ली। लोनावाला में हुए इस विवाह समारोह में पूजा ने शानदार प्रवेश किया और हल्दी और संगीत जैसे कार्यक्रम भी हुए।