"त्यांनी एक पुस्तक लिहिलं, ज्यामध्ये..."; शिवानी सुर्वेने सांगितल्या 'देवयानी' मालिके दरम्यानचा 'तो' प्रसंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:36 IST2025-12-02T18:33:11+5:302025-12-02T18:36:53+5:30
"कोल्हापुरातील एका गृहस्थाने...", शिवानी सुर्वेने सांगितल्या देवयानी मालिकेदरम्यानचा प्रसंग, म्हणाली...

"त्यांनी एक पुस्तक लिहिलं, ज्यामध्ये..."; शिवानी सुर्वेने सांगितल्या 'देवयानी' मालिके दरम्यानचा 'तो' प्रसंग!
Shivani Surve: अभिनेत्री शिवानी सुर्वे ही मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय नायिका आहे. तिने आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम करून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मात्र, शिवानी आजही तिच्या देवयानी मालिकेमुळे ओळखली जाते. या मालिकेने तिला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली.
नुकतीच शिवानीने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने देवयानी मालिकेदरम्यानची एक गोड आठवण शेअर केली. दरम्यान, मुलाखतीत अभिनेत्रीला आतापर्यंतची तुझ्या लक्षात राहणारी मोमेंन्ट कोणती असा प्रश्न विचारण्यात आला. ती आठवण शेअर करताना शिवानी म्हणाली, "कोल्हापुरात एक गृहस्थ राहतात जे माझे खूप मोठे चाहते आहेत. देवयानी मालिका सुरु असताना त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. ज्यामध्ये माझ्यासाठी स्वत: हाताने चारोळ्या लिहिल्या आहेत. शिवाय मालिकेतील सगळ्या सीन्सचे फोटो त्यात लावले आहेत. मी ते जेव्हा पाहिलं तेव्हा वाटलं हे टीव्हीमुळे शक्य आहे. कारण, तुम्ही टीव्हीमुळे तु्म्ही घराघरात पोहोचता."
पुढे ती म्हणाली, "ते गृहस्थ प्राध्यापक आहेत. आणि एवढ्या व्यग्र वेळेतून त्यांनी ते माझ्यासाठी करणं ही मोठी गोष्ट आहे. कारण, ते पुस्तक तयार करण्यासाठी किमान दोन-अडीच महिने गेले असतील. कोणीतरी त्यांच्या आयुष्यातला इतका मोठा वेळ आपल्यासाठी दिला ते खूप भारावून टाकणारं होतं. एक अभिनेत्री म्हणून मला असंही वाटत होतं की, आता आपण जे काही करतोय ते सिरिअसली घेतलं पाहिजे. कारण आपण जे काम करतोय त्याच्याकडे लोकांचं लक्ष आहे." असा किस्सा अभिनेत्रीने शेअर केला.