लग्नाच्या ७ वर्षांनी मराठी अभिनेत्रीने बदललं स्वत:चं नाव, म्हणाली- "मी हा निर्णय घेतला कारण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:37 IST2025-12-09T13:37:32+5:302025-12-09T13:37:53+5:30
मराठी अभिनेत्रीने लग्नाच्या ७ वर्षांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर ७ वर्षांनी अभिनेत्रीने तिचं नाव बदललं आहे.

लग्नाच्या ७ वर्षांनी मराठी अभिनेत्रीने बदललं स्वत:चं नाव, म्हणाली- "मी हा निर्णय घेतला कारण..."
मराठी अभिनेत्रीने लग्नाच्या ७ वर्षांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर ७ वर्षांनी अभिनेत्रीने तिचं नाव बदललं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत यामागचं कारण अभिनेत्रीने सांगितलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे रुचिता जाधव आहे. रुचिताने इन्स्टाग्रामवर तिच्या नावात बदल केला आहे. लग्नानंतरही रुचिता माहेरचं नाव लावत होती. मात्र आता तिने तिच्या नवऱ्याचं नाव लावण्याचा निर्णय घेतला असून याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. रुचिताने नाव बदलून आता रुचिता आनंद माने असं केलं आहे.
रुचिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, "मी इन्स्टाग्रामवर आज माझं नाव बदललं आहे. एका छोट्या गोष्टीत बदल करण्यासाठी मला ७ वर्ष लागली. आठवणींची, पुढे जाण्याची, संघर्षाची आणि मी कोण आहे ते ओळखण्याची ही ७ वर्ष. रुचिता जाधव म्हणून मी लहानाची मोठी झाले. आणि त्या मुलीवर, तिच्या स्वप्नांवर, तिच्यातील ऊर्जेवर मी कायमच प्रेम करत राहीन. पण, आयुष्याने मला एक अशी व्यक्ती दिली जी केवळ माझा नवरा नाही तर माझं सुरक्षित ठिकाण, माझी शांतता आणि कुठल्याही परिस्थितीत मिळून मार्ग काढणारी ऊर्जा आहे".
"त्यामुळे आज इथेही मी रुचिता आनंद माने होण्याचा निर्णय घेतला आहे. परंपरा किंवा सोसायटी प्रेशर म्हणून नाही. तर मला गर्व आहे म्हणून... गर्व आहे एका सुंदर व्यक्तीसोबत असल्याचा, त्याचं नाव माझ्या नावात लावण्याचा, त्याच्याबरोबर आयुष्य जगण्याचा. हे सर्व करायला मला ७ वर्ष लागली. कारण माझ्यासाठी ते तितकं महत्त्वाचं आहे. नवीन नाव... पण आत्मा तोच... फक्त भरपूर प्रेम, जास्त हेतू आणि ऊर्जा", असं तिने पुढे म्हटलं आहे. रुचिता जाधव हिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. २०१९ साली रुचिताने आनंद माने यांच्यासोबत लग्न करत संसार थाटला.