सूरज चव्हाणच्या लग्नानंतर जान्हवी किल्लेकर रुग्णालयात दाखल, फोटो शेअर करत म्हणाली - "नजर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 09:23 IST2025-12-02T09:21:49+5:302025-12-02T09:23:13+5:30
Janhvi Killekar : सूरज चव्हाणच्या लग्नाला जान्हवी किल्लेकरने हजेरी लावली होती. यावेळी ती प्रत्येक ठिकाणी वरासोबत दिसली. पण आता लग्नानंतर तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.

सूरज चव्हाणच्या लग्नानंतर जान्हवी किल्लेकर रुग्णालयात दाखल, फोटो शेअर करत म्हणाली - "नजर..."
'बिग बॉस मराठी सीझन ५' चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण २९ नोव्हेंबर रोजी लग्नबेडीत अडकला. त्याने पुण्याजवळील सासवड येथे मोठ्या थाटामाटात पारंपरिक पद्धतीने चुलत मामाची मुलगी संजना गोफणेशी लग्न केले. सूरजच्या लग्नात जान्हवी किल्लेकर त्याची करवली बनली होती. ती लग्नात प्रत्येक ठिकाणी सूरजसोबत पाहायला मिळाली. मात्र आता लग्नानंतर जान्हवीला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. हो, हे खरंय. खुद्द तिनेच फोटो शेअर करुन याबद्दल माहिती दिली आहे.
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने अभिनेता सूरज चव्हाण याच्या लग्नातील सर्व विधींचा मनमुराद आनंद लुटला. मेंहदी, हळद, साखरपुडा आणि लग्नाची वरात अशा प्रत्येक कार्यक्रम ती एन्जॉय करताना दिसली. सूरज आणि त्याच्या पत्नीसोबत जान्हवीने केलेला डान्स, तसेच या सोहळ्यातील तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. सूरजच्या लग्नसोहळ्यातील तिची उपस्थिती आणि उत्साह पाहून चाहते जान्हवीचे कौतुक करत आहेत. तसेच या सोहळ्यादरम्यान झालेल्या प्रचंड गर्दीमुळे जान्हवी काहीशी संतापलेली दिसली होती आणि तिने लोकांना गर्दी न करण्याचे आवाहनही केले होते. मात्र, आता लग्नाचा हा उत्साह जान्हवीला चांगलाच महागात पडला आहे. तब्येत बिघडल्याने तिला मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे.
जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर तिचा हॉस्पिटलमधला फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले की, ''नजर इज रिअल.'' तिच्या या पोस्टवर चाहते काळजी व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले की, नजर लागल्या बघा १०० टक्के, दुसऱ्याने लिहिले की, 'छान दिसत होती म्हणून नजर लागली आहे', आणखी एकाने लिहिले की, काय झालं आहे धावपळीमुळे आजारी पडली आहे. तब्येतीची काळजी घ्यावी. याशिवाय अनेकांनी तिला काळजी घे. लवकर बरी हो अशा कमेंट्स केल्या आहेत.