स्वप्न पूर्ण झालं! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने घेतलं हक्काचं घर, आनंद व्यक्त करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 17:28 IST2025-12-07T17:24:16+5:302025-12-07T17:28:39+5:30
मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीने घेतलं हक्काचं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत दाखली झलक

स्वप्न पूर्ण झालं! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने घेतलं हक्काचं घर, आनंद व्यक्त करत म्हणाली...
Devoleena Bhattacharjee New Home: आपलं एक हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत जे आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न उराशी बाळगून दिवस-रात्र मेहनत करत असतात. दरम्यान, यंदाच्या वर्षात मराठीसह अनेक हिंदी कलाकारांतं आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं. आता या यादीत आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. हिंदी टेलिव्हिजनविश्वात सक्रिय असणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्रीने नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
Fil
साथ निभाना साथिया या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने )(Devoleena Bhattacharjee) नुकतंच नवीन घर खरेदी केलं आहे.देवोलिना भट्टाचार्जीची स्वप्नपूर्ती झाली आहे. सोशल मीडियावर आपल्या नव्या घराची झलक शेअर करत तिने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने हे घर मुंबईत खरेदी केलं असून तिने लाडका लेक आणि पतीसह या नव्या घरकुलात गृहप्रवेश देखील केला आहे.
अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर नवीन घराचे फोटो पोस्ट करत त्यावर सुंदर कॅप्शन देत लिहिलंय की, "काही स्वप्नं सत्यात उतरण्यासाठी वेळ, धैर्य आणि खूप विश्वास लागतो. आज माझ्या स्वप्नातील घरात उभी राहून मला या सर्व प्रकारच्या भावना जाणवतात. प्रवास, धडे आणि आम्हाला इथपर्यंत घेऊन आलेल्या आशीर्वादांबद्दल मी आभारी आहे... अशा आशयाची पोस्ट अभिनेत्रीने लिहिली आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर तिच्या कलाकार मित्र-मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री मनोभावे पूजा करताना दिसते आहे. तर तिचा पती देखील आरती करतो आहे. यावेळी देवोलिनाने गृहप्रवेश करताना डोक्यावर कलश घेतला आहे, तर तिच्या नवऱ्याच्या हातात देवाची मूर्ती पाहायला मिळतेय. देवोलिनाच्या पतीच्या या कृतीचं देखील सगळेच कौतुक करत आहेत.
देवोलिना भट्टाचार्जीने २०२२ साली शाहनवाज शेखसोब लग्नगाठ बांधली. त्यानंतर लग्नाच्या दोन वर्षानंतर अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. आता लाडक्या लेकासह ती नव्या घरात प्रवेश केला आहे.