Bigg Boss 19: प्रणित मोरेचं स्वप्न भंगलं! 'बिग बॉस' मधून बाहेर; चाहत्यांची घोर निराशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 23:26 IST2025-12-07T23:24:09+5:302025-12-07T23:26:40+5:30
'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील सगळ्यात वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जातो.

Bigg Boss 19: प्रणित मोरेचं स्वप्न भंगलं! 'बिग बॉस' मधून बाहेर; चाहत्यांची घोर निराशा
Bigg Boss 19 Pranit More Evicted From Top 3: 'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील सगळ्यात वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. दरवर्षी या शोमध्ये मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी देखील सहभागी होतात. गेल्या काही दिवसांमध्ये या शोची चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होती, हा शो आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. नुकताच लोकप्रिय संगीतकार-गायक अमाल मलिक हा टॉप ५ मधून बाहेर पडला आहे. त्यानंतर आणखी एका स्पर्धकाच्या एक्झिटने चाहत्यांची घोर निराशा झाली आहे.
दरम्यान, या पर्वाच्या अंतिम फेरीत गौरव खन्ना, अमाल मलिक तसेच प्रणित मोरे, तान्या मित्तल, फरहाना भट्ट हे स्पर्धक पोहोचले आहेत.दरम्यान, घरातील ड्रामा, भांडण तसेच स्पर्धकांची मैत्री आणि त्यामुळे समीकरणात झालेले बदल पाहायला मिळाले. महाराष्ट्राचा मुलगा प्रणित मोरे यंदाच्या ट्रॉफी जिंकेल, असं अनेकांना वाटलं होतं,पण चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.
प्रणित मोरेचं ट्रॉफीचं स्वप्न हुकलं...
यंदाची थीम ही राजनीतीवर आधारित होती. या सीझनमध्ये १८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. काहींना प्रणित मोरे विजेता होणार अशी अपेक्षा होती. कारण त्याचा खेळ सुरुवातीच्या दिवसापासून मजबूत होता. मात्र, टॉप ३ मधून प्रणित मोरे बाहेर पडला आहे.
बिग बॉस १९ चा प्रिमिअर हा २४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसारित झाला. या सीझनमध्ये १८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. हे स्पर्धक म्हणजे गौरव खन्ना,अमाल मलिक, तान्या मित्तल, प्रणित मोरे, अशनूर कौर, नेहल चुडामासा, बसीर अली, नीलम गिरी,अवेज दरबार, जीशान कादरी, अभिषेक बजाज, नतालिया जानोस्झेक, फरहाना भट्ट, कुनिका सदानंद, मृदुल तिवारी हे स्पर्धक यंदाच्या पर्वात पाहायला मिळाले. मात्र, यातील फक्त गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट हे 2 स्पर्धक उरले आहेत, ज्यांनी अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. आता बिग ब़़ॉसच्या ट्रॉफिपर्यंत पोहोचण्यासाठी या स्पर्धकांमध्ये अति-तटीची शर्यत पाहायला मिळतेय.