प्रणित मोरे 'बिग बॉस १९'मधील मित्रांसह 'या' ठिकाणी जाणार ट्रिपवर, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 09:23 IST2025-12-09T09:22:23+5:302025-12-09T09:23:01+5:30
यंदाच्या पर्वातील 'टॉप ३' मध्ये स्थान मिळवलेला प्रणित मोरे याने चाहत्यांना आणखी एक रोमांचक बातमी दिली आहे.

प्रणित मोरे 'बिग बॉस १९'मधील मित्रांसह 'या' ठिकाणी जाणार ट्रिपवर, म्हणाला...
'बिग बॉस'चा १९वा सीझन नुकताच संपला आहे. या पर्वात १६ स्पर्धक सहभागी झाले होते आणि दोन वाइल्ड कार्ड एन्ट्री झालेल्या. गौरव खन्ना या पर्वाचा विजेता ठरला असून फरहाना भट्ट उपविजेती ठरली. तर, प्रणित मोरे तिसऱ्या क्रमांकावरून बाहेर पडला. 'बिग बॉस १९'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्पर्धकांचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. यंदाच्या पर्वातील 'टॉप ३' मध्ये स्थान मिळवलेला प्रणित मोरे याने चाहत्यांना आणखी एक रोमांचक बातमी दिली आहे. प्रणितने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, तो लवकरच आपल्या 'बिग बॉस १९' मधील मित्रांसह एका खास ट्रिपवर जाणार आहे.
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेनंतर प्रणित मोरेनं स्क्रीनशी संवाद साधला. या संवादात प्रणितनं बिग बॉसनंतर आता पुढे काय करणार, याविषयी सांगितलं. प्रणित मोरेने सांगितले की, तो आपल्या खास मित्रांसोबत गोवा ट्रिप प्लॅन करत आहे. तीन महिन्यांच्या 'बिग बॉस'च्या व्यस्त आणि तणावपूर्ण प्रवासानंतर, सर्वजण आता मजा करण्यासाठी उत्सुक आहेत.
बिग बॉसच्या घरात खास मैत्रीचे बंध जुळले, आणि आता ही मैत्री घराबाहेरही टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी हा प्लॅन केला आहे. या ट्रिपमध्ये 'बिग बॉस १९'मधील प्रणितचे कोण-कोणते मित्र सामील होतील, तसेच ही ट्रिप कधी जाणार, याबद्दलचे तपशील त्याने अद्याप जाहीर केलेले नाहीत.

'बिग बॉस' हिंदीच्या घरात प्रणित मोरे हा एकमेव मराठी स्पर्धक सहभागी झाला आहे. स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रणित मोरेने अल्पावधीतच सर्वांची मनं जिंकून घेतली. सोशल मीडियावर सर्वत्र त्याची क्रेझ निर्माण झाली. त्याला चाहते 'महाराष्ट्रीयन भाऊ' म्हणून देखील ओळखतात. 'बिग बॉस' हिंदीनंतर प्रणितच्या स्टँडअप शोसाठी चाहेत उत्सुक आहेत.