'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले आज किती वाजता सुरु होणार, Live कुठे पाहता येणार? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 14:00 IST2025-12-07T13:59:33+5:302025-12-07T14:00:21+5:30
'बिग बॉस १९'चा महाअंतिम सोहळा कधी, कुठे आणि कसा पाहता येईल, याची आपण माहिती घेणार आहोत.

'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले आज किती वाजता सुरु होणार, Live कुठे पाहता येणार? जाणून घ्या...
Bigg Boss 19 Grand Finale 2025 : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'बिग बॉस'कडे पाहिले जाते. 'बिग बॉस' हिंदीच्या १९ व्या पर्वाचा रंजक प्रवास आता लवकरच संपणार आहे.सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस १९' हिंदीचा महाअंतिम सोहळा आज रविवारी म्हणजेच ७ डिसेंबर रोजी रंगणार आहे. यंदा 'बिग बॉस' हिंदीच्या पर्वाचा विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. 'बिग बॉस १९'चा महाअंतिम सोहळा कधी, कुठे आणि कसा पाहता येईल, याची आपण माहिती घेणार आहोत.
'बिग बॉस १९'चा प्रीमियर २४ ऑगस्ट २०२५ रोजी जिओहॉटस्टार आणि कलर्स टीव्हीवर झाला होता. या शोमध्ये एकूण १८ स्पर्धक सहभागी झाले होते आणि त्यांच्यापैकी अंतिम फेरीमध्ये ५ जणांनी धडक मारली. ज्यात तान्या मित्तल, फराहना भट्ट, गौरव खन्ना, प्रणित मोरे आणि अमाल मलिक हे स्पर्धक शिल्लक आहेत. या पाचपैकी एक जण 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी उचलणार आहे.
आज रात्री ९ वाजता जिओ हॉटस्टारवर ग्रँड फिनाले सुरू होईल. त्यानंतर १०.३० वाजता कलर्सवर प्रसारित होईल. ग्रँड फिनालेमध्ये, 'बिग बॉस'चे स्पर्धक त्यांच्या डान्स परफॉर्मेंसनं प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतील. त्यानंतर कोणता स्पर्धक शेवटी 'बिग बॉस १९' चमकदार ट्रॉफी जिंकेल हे उघड होईल.

'बिग बॉस १९'च्या विजेत्याला मिळणार ही रक्कम
जसजसा फिनाले जवळ येत आहे तसतसे बक्षीस रकमेबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. अशी चर्चा आहे की विजेत्याला मोठी रक्कम मिळू शकते, जी ५० लाखांच्या दरम्यान असेल.