आईकडून औक्षण, केक कटिंग अन्...; तीन महिन्यानंतर प्रणित मोरे मुंबईतील घरी पोहोचला, कुटुंबियांनी 'असं' केलं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 09:06 IST2025-12-09T09:01:58+5:302025-12-09T09:06:40+5:30
Video: तीन महिन्यांनी घरी पोहचला प्रणित मोरे,महाराष्ट्रीयन भाऊचं 'असं' झालं स्वागत, चाहते म्हणाले- "खरा विजेता..."

आईकडून औक्षण, केक कटिंग अन्...; तीन महिन्यानंतर प्रणित मोरे मुंबईतील घरी पोहोचला, कुटुंबियांनी 'असं' केलं स्वागत
Pranit More Video: 'बिग बॉस १९' च्या यंदाच्या पर्वाचा ग्रॅंड फिनाले नुकताच पार पडला. जवळपास तीन महिने या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. गौरव खन्ना, अमाल मलिक, तान्या मित्तल, प्रणित मोरे आणि फरहाना भट्ट हे पाटच फायनलिस्ट होते. मात्र, यंदाची ट्रॉफी टीव्ही अभिनेता गौरव खन्नाने उंचावली. तर महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरेला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.
दरम्यान, बिग बॉसच्या घरात प्रणित मोरेचा दमदार खेळ पाहायला मिळाला. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव प्रणितला या घरातून बाहेर पडावं लागलं होतं. इतकंच नव्हे चाहत्यांकडूनही तो शोमध्ये परत यावा, अशी मागणी केली गेली आणि तो परत आला. प्रणितचा बिग बॉसच्या घरातील हा प्रवास फारचं रंजक होता. आता जवळपास तीन महिन्यानंतर प्रणित मोरे त्याच्या मुंबईतील घरी पोहोचला आहे. यावेळी त्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती.
प्रणित घरी पोहोचल्यानंतर त्याच्या मित्र-मंडळींनी जंगी सेलीब्रेशन करत त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला. याशिवाय संपू्र्ण घरात सजावट करण्यात आली होती. पुढे कॉमेडियनचं आई मराठमोठ्या पद्धतीने औक्षण करते.असं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. त्यानंतर मग प्रणित लाडक्या पुतण्यासह केक कटिंग करतो. दरम्यान, त्याचं स्वागत करण्यासाठी बिल्डिंगमधील लोक आणि मित्र परिवार जमा झाल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडीओवर प्रणितचे चाहते तसेच नेटकरी कमेंट्सच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. "खरा विजेता प्रणित मोरे…" तसेच "तू ट्रॉफी जिंकली नसली तरी अनेकांची मनं जिंकलीस...", अशा भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. बिग बॉस च्या घरात वावरताना प्रणितने कायम प्रत्येकाला खळखळून हसवलं. तसंच अनेकदा त्याच्या मराठी संस्कारांनी अनेकांची मनं जिंकली. या घरातील त्याची आणि मालची चहरची मैत्रीही चांगलीच चर्चेत राहिली.