Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस १९'मधून पहिला स्पर्धक घराबाहेर; लोकप्रिय गायक अमाल मलिकचा प्रवास संपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 22:35 IST

बिग बॉस हिंदी १९ व्या पर्वाचा ग्रॅंड फिनालेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे.

Bigg Boss 19: बिग बॉस हिंदी १९ व्या पर्वाचा ग्रॅंड फिनालेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. २४ ऑक्टोबर रोजी सुरु झालेल्या पर्वाने प्रेक्षकांचं अगदी पुरेपूर मनोरंजन केलं आज ७ डिसेंबरला या पर्वाचा ग्रॅंड फिनाले पार पडणार आहे. दरम्यान, या पर्वाच्या अंतिम फेरीत गौरव खन्ना, अमाल मलिक तसेच प्रणित मोरे, तान्या मित्तल, फरहाना भट्ट हे स्पर्धक पोहोचले आहेत.या टॉप ५ स्पर्धकांपैकी आता या पर्वाचा कोण विजेता ठरतोय, याकडे सगळ्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. अशातच सलमान खानच्या 'बिग बॉस १९' च्या ग्रँड फिनालेची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच, चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

यंदाची थीम ही राजनीतीवर आधारित होती. या सीझनमध्ये १८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. बिग बॉस हिंदीच्या १९ व्या पर्वाचा लोकप्रिय गायक अमाल मलिक हा बाहेर पडला आहे.काहींना अमाल विजेता होणार अशी अपेक्षा होती. कारण त्याचा खेळ सुरुवातीला टास्कमध्ये दमदार खेळी करताना  दिसला होता. मात्र, टॉप ५ मधून अमाल बाहेर पडला असून त्याचं ट्रॉफीचं स्वप्न  भंगलं आहे.

बिग बॉस १९ चा प्रिमिअर हा २४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसारित झाला. या सीझनमध्ये १८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. हे स्पर्धक म्हणजे गौरव खन्ना,अमाल मलिक, तान्या मित्तल, प्रणित मोरे, अशनूर कौर, नेहल चुडामासा, बसीर अली, नीलम गिरी,अवेज दरबार, जीशान कादरी, अभिषेक बजाज, नतालिया जानोस्झेक, फरहाना भट्ट, कुनिका सदानंद, मृदुल तिवारी हे स्पर्धक यंदाच्या पर्वात पाहायला मिळाले.आता बिग ब़़ॉसच्या टॉप ३ स्पर्धकांमध्ये ट्रॉफिपर्यंत पोहोचण्यासाठी या स्पर्धकांमध्ये कॉंटे की टक्कर  पाहायला मिळतेय.

English
हिंदी सारांश
Web Title : Amaal Mallik Eliminated First from 'Bigg Boss 19' Finale

Web Summary : 'Bigg Boss 19' grand finale began. Singer Amaal Mallik was eliminated from the top 5. The show premiered on October 24, 2025, featuring eighteen contestants.
टॅग्स :बिग बॉस १९टेलिव्हिजन