"ती माझ्यासोबत फ्लर्ट करते, मी भाव देत नाही म्हणून...", अभिषेकने केली तान्याची पोलखोल, मित्तल मॅडम म्हणाली- "तुझ्यासोबत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 16:57 IST2025-11-04T16:56:45+5:302025-11-04T16:57:11+5:30

घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये शहबाज आणि अभिषेक बजाज तान्या मित्तलची पोलखोल करताना दिसत आहेत. 

bigg boss 19 abhishek bajaj said tanya mittal flirts with me video viral | "ती माझ्यासोबत फ्लर्ट करते, मी भाव देत नाही म्हणून...", अभिषेकने केली तान्याची पोलखोल, मित्तल मॅडम म्हणाली- "तुझ्यासोबत..."

"ती माझ्यासोबत फ्लर्ट करते, मी भाव देत नाही म्हणून...", अभिषेकने केली तान्याची पोलखोल, मित्तल मॅडम म्हणाली- "तुझ्यासोबत..."

Bigg Boss 19 : 'बिग बॉस १९'मध्ये सुरुवातीपासून तान्या मित्तलने सांगितलेल्या तिच्या स्टोरीमुळे आणि छोट्या छोट्या कारणावरुन रडण्याच्या स्वभावामुळे तिला ट्रोलही केलं गेलं आहे. पण, आता मात्र घरातील सदस्यांनाही हळूहळू तान्याच्या या स्वभावाचा त्रास होऊ लागला आहे. घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये शहबाज आणि अभिषेक बजाज तान्या मित्तलची पोलखोल करताना दिसत आहेत. 

शहबाजने घरातल्या सदस्यांशी बोलताना सांगितलं होतं की तो त्याच्या मित्रासोबत काम करतो. मित्र त्याला मीटिंगला घेऊन जातो आणि त्यातले काही पर्सेंट त्याला देतो. यावरुन तान्या शहबाजला तू कमावण्यासाठीही मित्रावर अवलंबून आहेस असं म्हणते. तान्याच्या बोलण्याने शहबाज दुखावतो आणि त्याला अश्रू अनावर होतात. तान्याच्या वागण्याने दुखावलेला शहबाज नंतर घरातील सदस्यांसमोर तान्याचा खरा चेहरा समोर आणतो. व्हिडीओमध्ये दिसतंय की शहबाज लिव्हिंग एरियामध्ये घरातील सगळ्या सदस्यांसमोर ओरडून म्हणतो की "मी तुम्हाला हिचं खरं रुप सांगतो. कोणतीही छोटीशी गोष्ट असेल ही दोन मिनिटांत रडते. लोकांना हे दाखवते की मी किती सुंदर, सुशील आणि चांगली आहे". त्यानंतर अश्नूर सिंपती कार्ड असं जोरात बोलते. 


मग अभिषेक बजाज तान्या मित्तलबाबत धक्कादायक खुलासा करतो. अभिषेक म्हणतो, "ही एकट्यात येऊन माझ्यासोबत फ्लर्ट करते. मी भाव दिला नाही तर म्हणते तू मला एकट्यात का भेटत नाहीस". अभिषेकचं बोलणं ऐकून तान्या मित्तलचा तिळपापड होतो. तान्या त्याला म्हणते, "फालतूच्या काहीही गोष्टी बोलू नको. मला तुझ्यासोबत फ्लर्ट करायची काहीच गरज नाही. स्वत:चा चेहरा बघ. तू माझ्या टाइपचा पण नाहीस". 

Web Title: bigg boss 19 abhishek bajaj said tanya mittal flirts with me video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.