'देवमाणूस- मधला अध्याय'मध्ये मोठा ट्विस्ट, लालीच्या जाळ्यात अडकेल का अजित?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 17:46 IST2025-12-02T17:46:27+5:302025-12-02T17:46:47+5:30
Devamanus- Madhla Adhyay :'देवमाणूस- मधला अध्याय' मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. आर्या आणि साकेतमधील वादानंतर परिस्थिती गंभीर बनली.

'देवमाणूस- मधला अध्याय'मध्ये मोठा ट्विस्ट, लालीच्या जाळ्यात अडकेल का अजित?
'देवमाणूस- मधला अध्याय' मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. आर्या आणि साकेतमधील वादानंतर परिस्थिती गंभीर बनली. आर्या हा संपूर्ण प्रसंग अजीतला सांगते आणि अजीत तिला बँकेतून पैसे काढण्यास प्रवृत्त करतो. मात्र, त्या व्यवहारासाठी साकेतची सही आवश्यक असल्याने तो नकार देतो. त्यामुळे त्यांच्यात तीव्र वाद निर्माण होतो.
वाद वाढत असतानाच आर्या भावनिकदृष्ट्या अजीतच्या अधिक जवळ येऊ लागलेय. हे पाहून लालीच्या मनात मत्सर निर्माण होतो. दरम्यान, अजीत आर्याला भेटण्याचे प्रयत्न करत असताना साकेतविरुद्ध खोट्या अफवा पसरवण्याचे षड्यंत्रही आखतो, ज्यामुळे जामकरच्या मनातला संशय अधिक बळावणार आहे. अजीतच्या अफवांमुळे जामकर रागाने साकेतला जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन जातो. त्यांच्या मागोमाग अजीतही निघतो.
अजित लालीच्या जाळ्यात अडकेल?
एका निर्मनुष्य ठिकाणी जामकर साकेतला ठेवतो. अजीत साकेतला सामोरे जातो, ज्यातून त्यांच्या दोघांत संघर्ष होतो. रागाच्या भरात अजीत त्याचा खून करून त्याचे शरीर नदीत फेकून देतो. पण त्याचवेळी शामल अजीतला साकेतचा खून करताना पाहते आणि भीतीने जंगलात पळते. तिच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्याच जंगलात लालीने अजितला अडकण्यासाठी जाळं लावल आहे. आता अजित लालीच्या जाळ्यात अडकेल? शामल, अजितच्या तावडीत सापडेल का? हे पाहणे कमालीचे ठरेल.