Join us
Daily Top 2Weekly Top 5

"सलमान खानसोबत...", भोजपुरी स्टार पवन सिंहला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 17:38 IST

Pawan Singh And Salman Khan : भोजपुरी स्टार पवन सिंहला लखनौमध्ये धमकी मिळाली आहे.

भोजपुरी स्टार पवन सिंहला लखनौमध्ये धमकी मिळाली आहे. अभिनेत्याला एका अज्ञात नंबरवरून फोन आला. या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचं सांगितलं. तसेच धमकीत पवन सिंहला अभिनेता सलमान खानसोबत स्टेज शेअर करू नये असंही सांगण्यात आलं.

पवन सिंहची टीम पोलिसांना या प्रकरणाची माहिती देईल. पवन बिग बॉसच्या फायनलमध्ये आज परफॉर्मेन्स देणार आहे. बिग बॉसचा सेट गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये आहे. अशातच आता धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे.

पवन फोनवरून धमकी देण्यात आली होती की जर त्याने सलमान खानसोबत स्टेज शेअर केला तर तो पुन्हा कधीही काम करू शकणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवनकडून मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली.

पवन सिंह हा भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. तो सध्या लखनौमध्ये राहतो. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलीस तपासात धमकी देणारी व्यक्ती कोण आहे आणि तो कोणत्या गँगशी संबंधित आहे हे उघड होईल. अभिनेत्याची टीम सध्या पोलिसांना या प्रकरणाची माहिती देत ​​आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pawan Singh threatened by Bishnoi gang for Salman Khan show.

Web Summary : Bhojpuri star Pawan Singh received threats, allegedly from the Lawrence Bishnoi gang, warning him against performing with Salman Khan at a Big Boss finale. The gang demanded money and threatened to ruin his career if he didn't comply. Police are investigating.
टॅग्स :सलमान खानबिग बॉस १९बॉलिवूडपोलिसगुन्हेगारी