लेकाच्या संगीत सोहळ्यात आदेश आणि सुचित्रा बांदेकरांचा भन्नाट डान्स, Video होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:40 IST2025-12-02T12:40:21+5:302025-12-02T12:40:44+5:30
सोहम आणि पूजाच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

लेकाच्या संगीत सोहळ्यात आदेश आणि सुचित्रा बांदेकरांचा भन्नाट डान्स, Video होतोय व्हायरल
मराठी कलाविश्वातील बांदेकर कुटुंबीयांच्या घरीही लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. लोकप्रिय अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम आज बोहल्यावर चढणार आहे. सोहम अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासोबत संसार थाटणार आहे. सोहम आणि पूजाने वेडिंगसाठी 'मजा' हॅशटॅग ठेवलं आहे. कालच दोघांची हळद उत्साहात झाली. तर सोमवारी रात्री संगीत फंक्शनही जल्लोषात पार पडलं. आपल्या लाडक्या लेकाच्या संगीत सोहळ्यात आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी जबरदस्त डान्स केला.
सोहम आणि पूजाच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आदेश व सुचित्रा बांदेकर या संगीत सोहळ्यात शाहरुख खानच्या "मेरे महबूब मेरे सनम..." गाण्यावर जबरदस्त डान्स केला. आदेश आणि बांदेकर यांनी संगीत सोहळ्यासाठी ट्विनिंग लूक केला होता. आदेश व सुचित्रा हे लेकाच्या लग्नात खूपच आनंदी असल्याचं दिसलं. या दोघांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
सोहम आणि पूजाचं कुठे पार पडणार लग्न?
आज पूजा-सोहमच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. सोहम सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘ठरलं तर मग’ या दोन मालिकांचा निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. या दोन्ही मालिकांमधील काही कलाकार सोहमच्या लग्नाला उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय पूजा बिरारी सध्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या टीमने तिचं केळवण सुद्धा केलं होतं. त्यामुळे या मालिकेच्या टीमचे काहीजण सुद्धा पूजाला शुभेच्छा देण्यासाठी लग्नाला येतील. मुंबई नाही तर लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये त्यांचं हे ग्रँड वेडिंग आहे.