माधवी भिडे 'चेन स्मोकर'? 'त्या' फोटोशूटमुळे ट्रोल झाल्यावर सोनालिका म्हणाली- "माझ्या घरी हे.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 12:30 IST2025-07-18T12:30:03+5:302025-07-18T12:30:33+5:30
हातात सिगारेट धरतानाचा माधवी भिडेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो पाहून तिला अनेकांनी ट्रोल केलं. अखेर माधवीने याप्रकरणी खुलासा केला

माधवी भिडे 'चेन स्मोकर'? 'त्या' फोटोशूटमुळे ट्रोल झाल्यावर सोनालिका म्हणाली- "माझ्या घरी हे.."
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेमध्ये माधवी भिडेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सोनालिका जोशीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. एका फोटोशूटदरम्यान सोनालिकाने हातात सिगारेट घेतलेला एक फोटो प्रसिद्ध झाला. या फोटोमुळे अनेकांनी तिला ‘चेन स्मोकर’ असल्याचं म्हटलं आणि तिच्यावर टीका सुरू झाली. यामुळे सोनालिकाला त्रास झाला. ती या प्रकरणावर काय म्हणाली, जाणून घ्या
माधवी भिडे चेन स्मोकर?
फोटो व्हायरल झाल्यावर होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देताना सोनालिकाने स्पष्ट केलं की, तो फोटो केवळ फोटोशूटसाठी होता आणि प्रत्यक्षात ती सिगारेट पित नाही. सोनालिका म्हणाली, "तो फोटो केवळ एक स्टाइलिश पोझ होता. मी खरंच सिगारेट ओढत नव्हते. पण लोकांनी ते पाहिलं आणि मला 'चेन स्मोकर' म्हणायला सुरुवात केली. लोकांना जे पाहायचं असतं, तेच ते पाहतात. मी काहीही स्पष्टीकरण दिलं असतं तरी लोकांना त्यांच्या मनातील गोष्टच खरी वाटते. त्यामुळे मी शांत राहणंच पसंत केलं."
सोनालिका जोशीने हे देखील सांगितलं की, या फोटोशूटमुळे तिच्यावर अनेक बाजूंनी टीका होत जरी असली तिच्या कुटुंबाने तिला याबाबतीत खूप सपोर्ट केला. समाजात आणि सोशल मीडियावर काय बोललं जातंय, याचा त्यांना काहीही फरक पडत नव्हता. "कुटुंब माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे बाहेरच्यांची मतं मला महत्त्वाची वाटत नाहीत," असं सोनालिका म्हणाली. २००८ पासून 'तारक मेहता' मालिकेत काम करत असलेल्या सोनालिका जोशीने मालिकेतील अभिनयाबरोबरच रंगभूमी आणि फॅशन डिझायनिंग क्षेत्रातही काम केलं आहे. सध्या ती आपलं करिअर आणि वैयक्तिक आयुष्य दोन्हीकडे लक्ष देत आहे.