कसा आहे रणवीरचा 'धुरंधर'? साउथ स्टार विजय देवरकोंडाची रिअॅक्शन चर्चेत, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:26 IST2025-12-09T12:12:55+5:302025-12-09T12:26:34+5:30
विजय देवरकोंडाला कसा वाटला धुरंधर? अभिनेता प्रतिक्रिया देत म्हणाला...

कसा आहे रणवीरचा 'धुरंधर'? साउथ स्टार विजय देवरकोंडाची रिअॅक्शन चर्चेत, म्हणाला...
Vijay Deverkonda Reaction on Dhurandhar:बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) बहुप्रतीक्षित 'धुरंधर' सिनेमा नुकताच ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा गँगस्टर-ड्रामा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.दमदार कलाकार, जबरदस्त कथानक आणि लोकप्रिय संगीत यामुळे 'धुरंधर' बॉक्स ऑफिवर कमाईचे विक्रम रचतो आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेकांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमावर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

'धुरंधर' चित्रपटाचं रणवीरचे चाहते आणि समीक्षकांनी तोंडभरून कौतुक केलं आहे.अशातच दक्षिण भारतीय अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverkonda) या सिनेमाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. विजयला हा सिनेमा कसा वाटला, याबद्दल त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आणि 'धुरंधर' चं भरभरून कौतुक केलं आहे. या स्टोरीच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय की, 'काल रात्री धुरंधरला पाहिला.खूप मजा आली.त्यानंतर विजयने चित्रपटातील कास्टिंग आणि दिग्दर्शकाचं कौतुक करत म्हटलंय," पोरांनी आग लावली. संपूर्ण टीमला खूप खूप प्रेम आणि अभिनंदन...", असं त्याने या स्टोरीमध्ये लिहिलंय.
'धुरंधर' या स्पाय थ्रिलक चित्रपटात रणवीर सिंह द रॅथ ऑफ गॉड या कोडनेम असलेल्या रॉ-एजेंटची भूमिका साकारतो आहे.या चित्रपटात रणवीर सिंह, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि आर माधवन मुख्य भूमिकेत आहेत.सध्या बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे.