समांथा आणि राज निदिमोरु दोघेही आहेत घटस्फोटीत, कोण आहे श्यामली डे? ७ वर्षांनंतर तिच्या संसारात आलं वादळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 14:08 IST2025-12-02T14:08:04+5:302025-12-02T14:08:58+5:30
Samantha Ruth Prabhu and Raj Nidimoru : साउथची स्टार समांथा रुथ प्रभू दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. तिने दिग्दर्शक राज निदिमोरुसोबत दुसरं लग्न केलं आहे. त्यानंतर आता राजची पहिली पत्नीची क्रिप्टिक पोस्टदेखील समोर आली आहे.

समांथा आणि राज निदिमोरु दोघेही आहेत घटस्फोटीत, कोण आहे श्यामली डे? ७ वर्षांनंतर तिच्या संसारात आलं वादळ
साउथची लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu ) पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड राज निदिमोरु (Raj Nidimoru) याच्यासोबत एका खासगी समारंभात लग्न केले आहे. सामंथाने सोशल मीडियावर लग्नाची बातमीही शेअर केली. दोघांनी साधेपणाने सर्व विधी पार पाडून लग्न केले. समांथा आणि राज निदिमोरु या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. समांथाने २०१७ मध्ये नागा चैतन्यशी लग्न केले होते, तर राज निदिमोरु देखील घटस्फोटीत आहे. नागा चैतन्य आणि समांथाचे लग्न चार वर्षे टिकले आणि त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला.
राज आणि समांथा यांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू असतानाच, राज निदिमोरुच्या पहिल्या पत्नीने सोशल मीडियावर एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, "निराश लोक निराश करणारीच कामे करतात." ही पोस्ट पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. राज निदिमोरुची पहिली पत्नी श्यामली डे कोण आहे, हे जाणून घेऊयात.
राज निदिमोरुची पहिली पत्नी श्यामली डे कोण आहे?
श्यामली डेने मुंबई विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदवी मिळवली आहे. त्यानंतर तिने चित्रपट निर्मितीमध्ये काम करायला सुरुवात केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा आणि विशाल भारद्वाज यांच्यासोबत काम केले. तिने सहायक दिग्दर्शक, क्रिएटिव्ह कन्सल्टंट आणि स्क्रिप्ट रायटर म्हणून काम केले. 'रंग दे बसंती', 'ओमकारा' आणि 'एक नदीर गोल्पो' यांसारख्या गाजलेल्या प्रोजेक्ट्ससाठी तिने काम केले आहे. श्यामली देखील समांथाप्रमाणेच सिनेइंडस्ट्रीचा भाग आहे. राज आणि श्यामलीने २०१५ मध्ये लग्न केले होते. त्यांचे हे लग्न सात वर्षे चालले आणि २०२२ मध्ये ते वेगळे झाले. श्यामली डेने राज निदिमोरुच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये मदत केली आहे. राजने स्वतः अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या एक्स-वाईफचे कौतुक केले आहे. श्यामली नॉन फिल्मी पार्श्वभूमीतून येते, तरीही त्यांनी राजला अनेकदा कास्टिंगमध्ये मदत केली, असे राजने सांगितले होते.
राज निदिमोरुबद्दल...
राज निदिमोरुबद्दल बोलायचं झाल्यास आंध्र प्रदेशच्या असलेल्या राजने इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर अमेरिकेला गेला. तिथे त्याची भेट 'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक डीकेशी झाली. त्या दोघांनी मिळून चित्रपट निर्मितीमध्ये करिअर सुरू केले. त्याचा पहिला फीचर फिल्म '९९' होता.