समांथाच्या दुसऱ्या लग्नानंतर EX नागा चैतन्यची पहिली पोस्ट चर्चेत, शेअर केला 'तो' फोटो, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 11:28 IST2025-12-02T11:25:47+5:302025-12-02T11:28:40+5:30
समांथाच्या दुसऱ्या लग्नानंतर तिचा EX पती नागा चैतन्यची पहिली पोस्ट समोर आली आहे.

समांथाच्या दुसऱ्या लग्नानंतर EX नागा चैतन्यची पहिली पोस्ट चर्चेत, शेअर केला 'तो' फोटो, म्हणाला...
Naga Chaitanya Post After Ex Wife Samantha Marriage : अभिनेत्री समांथा रुथ प्रभू दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे. कोईम्बतूर येथील सद्गुरुंच्या ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात तिने दिग्दर्शक राज निदिमोरुसोबत सातफेरे घेतले. राज आणि समांथा या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. समांथाच्या दुसऱ्या लग्नानंतर तिचा पहिला पती नागा चैतन्य चर्चेत आला आहे.
समांथा आणि नागा चैतन्य यांनी २०१७ मध्ये थाटामाटात लग्न केलं होतं. तेलुगू इंडस्ट्रीतील सर्वात लाडकं जोडपं असलेल्या समांथा व नागा चैतन्यचं लग्न जास्त काळ टिकलं नाही. २०२१ मध्ये, त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला होता. आता समांथाच्या दुसऱ्या लग्नानंतर नागा चैतन्यची पहिली पोस्ट समोर आली आहे.
नागा चैतन्यने इन्स्टाग्रामवर त्याच्या 'धूता' चित्रपटातील एक इंटेन्स लूकमधील फोटो शेअर केलाय. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, "धूता हा एक असा शो आहे ज्याने सिद्ध केलं की जर तुम्ही एक अभिनेता म्हणून क्रिएटिव्हिटी आणि प्रामाणिकपणे निर्णय घेतले आणि तुमचे सर्वोत्तम दिले तर लोक तुमच्याशी कनेक्ट करतील. थँक्यू! 'धूता'ची २ वर्ष! हे सगळं शक्य करणाऱ्या टीमला खूप प्रेम". त्याने त्याच्या पोस्टमध्ये या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या लोकांना टॅग केलं आहे.
दरम्यान, समांथाशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यने शोभिता धुलिपालाशी लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाला येत्या ४ डिसेंबरला वर्ष पुर्ण होईल. नागा चैतन्यपासून वेगळं झाल्यानंतर समांथाच्या जीवनात अनेक चढउतार आलेत. समांथा खूप वाईट परिस्थितीमध्ये होती. घटस्फोटानंतर तिला 'मायोसिटिस या दुर्मिळ आजाराचा सामना करावा लागला. पण, सर्व संकटाचा तिनं मोठ्या हिंमतीनं सामना केला. आता अखेर समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत.