Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभासच्या 'द राजा साब' चित्रपटात 'या' बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री, पोस्टर पाहून चाहते उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:30 IST

वाढदिवशी बोमन ईराणींचं चाहत्यांना खास सरप्राईज! 'या' बिग बजेट चित्रपटात साकारणार हटके भूमिका

Boman Irani Entry In The Raja Saab Movie: दाक्षिणात्य अभिनेता प्रभास हा त्याच्या चित्रपटांमुळे प्रचंड चर्चेत असतो. 'बाहुबली' म्हणून प्रसिद्धी मिळवलेला आणि घराघरात पोचलेला हा अभिनेता  अनेकांच्या गळ्यातल्या ताईत बनला आहे. देशाच्या सर्व भागात त्याचे चाहते आहेत. मागील काही दिवसांपासून प्रभासच्या द राजा साब या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली. हा हॉरर कॉमेडी चित्रपट ९ जानेवारी २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशातच या चित्रपटाबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

प्रभासच्या मुख्य भूमिका असलेल्या या हॉरर-कॉमेडी चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यात आता या चित्रपटात बॉलिवूड अभिनेते बोमन इराणी यांची एन्ट्री झाली. निर्मात्यांनी बोमन इराणी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत त्यांच्या लूकमधील एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये बोमन इराणी पांढरे केस, गोल चष्मा, गंभीर चेहरा आणि हातात काठी घेऊन दिसत आहेत. त्यांचा हा लूक पाहून अनेकांच्या मनात व्यक्तिरेखेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. "The one who stands between REALITY and the UNEXPLAINED…", असं कॅप्शन देत निर्मात्यांनी सोशल मीडियावर बोमन ईराणीच्या लूकमधील पोस्टर शेअर केलं आहे.

'द राजा साब' या चित्रपटात प्रभास दुहेरी भूमिकेत आपली ताकद दाखवणार आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यात नकारात्मक भूमिकेत (Negative Role) दिसणार आहे. या दोघांची पडद्यावरील टक्कर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'द राजा साहेब'मध्ये मालविका मोहनन, निधी अग्रवाल, ब्रह्मानंद, बोमन इराणी आणि योगी बाबू यांचाही समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Boman Irani Joins Prabhas' 'The Raja Saab,' Fans Excited

Web Summary : Boman Irani joins Prabhas' horror-comedy, 'The Raja Saab,' as excitement builds. He plays a character standing between reality and the unexplained. Sanjay Dutt will play a negative role, heightening anticipation for the film's release.
टॅग्स :बोमन इराणीप्रभाससिनेमा