Join us

सोळा वर्षांनंतर... सखाराम बाईंडर रंगमंचावर

By admin | Updated: January 13, 2017 05:30 IST

तब्बल सोळा वर्षांनंतर सखाराम बाईंडर हे नाटक रंगभूमीवर येण्यास सज्ज झाले आहे.

तब्बल सोळा वर्षांनंतर सखाराम बाईंडर हे नाटक रंगभूमीवर येण्यास सज्ज झाले आहे. ललितकला केंद्रामध्ये शिक्षण घेत असताना मुक्ता बर्वे आणि संदीप पाठक या दोघांनीही या नाटकात काम केले होते. ‘‘तब्बल १६ वर्षांनंतर त्याच टीमबरोबर तोच काळ पुन्हा जगताना इतकं सुंदर वाटतंय, अशी पोस्ट मुक्ताने शेअर केली आहे. मात्र या नाटकाचे केवळ आता ५ प्रयोग होणार असल्याचे मुक्ताने सोशल मीडियावर सांगितले आहे. याविषयी संदीप पाठकने लोकमत सीएनएक्सला दिलेल्या मुलाखातीत सांगितले, की मी ललितकला केंद्रामध्ये शिकत असताना आम्ही स्टुडंट्स प्रॉडक्शन अंतर्गत सखाराम बाईंडर हे नाटक बसविले होते. या नाटकाचे त्या वेळी दोनच प्रयोग झाले होते. एक पुण्यात आणि दुसरा दिल्लीमध्ये. त्यावेळी आम्ही अगदी २०-२२ वर्षांचे होतो, तर आता आमच्यातील बरेचसे कलाकार जवळपास ३५-४० वर्षांचे झालेलो आहोत. त्यामुळे आता वयाचा आणि कामाचादेखील बराचसा अनुभव आम्हाला मिळालेला आहे. एका मॅच्युरिटी लेव्हलने हे नाटक पुन्हा एकदा करण्यास आम्ही सज्ज झालो आहोत. त्यामुळे पुन्हा एवढ्या वर्षांनंतर याच टीमसोबत हे नाटक करण्यासाठी मी फारच उत्सुक आहे.