रश्मिका मंदानाने सांगितलं आनंदी जगण्याचं सर्वात सोपं गणित, 'या' गोष्टींची करा निवड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 09:44 IST2025-12-09T09:44:18+5:302025-12-09T09:44:59+5:30
रश्मिकाच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलंय.

रश्मिका मंदानाने सांगितलं आनंदी जगण्याचं सर्वात सोपं गणित, 'या' गोष्टींची करा निवड!
Rashmika mandanna in marathi movie: संपूर्ण देशाला वेड लावणारी लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना नेहमीच चर्चेत असते. रश्मिकानं तिच्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी रश्मिका चाहत्यांच्या मनावर राज्य करते. तिच्या 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड', 'पुष्पा' आणि ''ॲनिमल' या चित्रपटांनी तिला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच संपूर्ण देशभरात लोकप्रियता मिळवून दिली. अलिकडेच रश्मिकाचा 'द गर्लफ्रेंड' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील रश्मिकाच्या अभिनयाचं भरभरून कौतुक होत आहे. अशातच रश्मिकाच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलंय.
रश्मिकानं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वतःचे फोटो शेअर करत एक पोस्ट शेअर करत सकारात्मक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने आनंदी जीवन जगण्याचा सल्ला चाहत्यांना दिलाय. तिनं लिहिलं, "जगभर फिरा... शोध घेत रहा... चुका करा... स्वतःला माफ करा... स्वतःवर प्रेम करा... खा... मनसोक्त हसा... आनंदात जगा... लोकांचा आदर करा... आयुष्याचा आदर करा... स्वतःचा आदर करा... इतरांशी दयाळू रहा... स्वतःशीही दयाळू रहा... स्वतःची निवड करा आणि मला आशा आहे की तुम्ही हे सगळं स्वतःसाठी निवडाल", असं म्हणत तिनं पोस्टचा शेवट केला.
रश्मिकानं आशा व्यक्त केली की, प्रत्येक व्यक्तीने आनंदी आणि शांत जीवन जगण्यासाठी या गोष्टी स्वतःसाठी निवडाव्यात. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केलाय. दरम्यान, रश्मिका तिच्या विजय देवरकोंडासोबतच्या नात्यामुळेही चर्चेत आहे. लवकरच दोघं लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांनी साखरपूडा उरकल्याचंही बोललं जातं. रश्मिका आणि विजय यांचा लग्न समारंभ शाही थाटात आणि पारंपारिक विधींनी पार पडणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, त्यांचे भव्य लग्न २६ फेब्रुवारी २०२ ६रोजी आहे. राजस्थानमधील उदयपूर येथील एका आलिशान राजवाड्यात हे लग्न होणार आहे.