Pranit More: महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरे 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी उचलणार? जाणून घ्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 10:42 IST2025-12-07T10:41:48+5:302025-12-07T10:42:01+5:30
चाहते आपल्या आवडत्या स्पर्धकाला भरभरून मते देत आहेत.

Pranit More: महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरे 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी उचलणार? जाणून घ्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंड
Bigg Boss 19 Grand Finale : सलमान खानच्या 'बिग बॉस १९' च्या विजेत्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अवघ्या काही तासांत चाहत्यांना या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले ७ डिसेंबर रोजी होणार आहे. टॉप ५ स्पर्धकही समोर आले आहेत. ज्यात गौरव खन्ना, तान्या मित्तल , प्रणित मोरे , अमाल मलिक आणि फरहाना भट्ट यांचा समावेश आहे. या पाच जणांपैकीच कोणीतरी विजेता ठरणार आहे. या टॉप ५ स्पर्धकांसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. चाहते आपल्या आवडत्या स्पर्धकाला भरभरून मते देत आहेत. यातच समोर आलेल्या मतदानाच्या ट्रेंडने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
अंतिम पाच स्पर्धकांमध्ये गौरव खन्ना, प्रणित मोरे, फरहाना भट्ट, अमाल मलिक आणि तान्या मित्तल यांचा समावेश आहे. जिथे गौरव आणि फरहाना यांना प्रबळ दावेदार मानले जात होते, तिथेच प्रणित मोरे याने मोठी आघाडी घेतली आहे.'बिग बॉस व्होट.इन' नुसार, अंतिम फेरीतील ताज्या मतदानाच्या ट्रेंडमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. प्रणित मोरे २,५०,८९९ मतांसह सर्वात मोठ्या फरकाने आघाडीवर आहे. तर गौरव खन्ना १,८८,५२३ मतांसह दुसऱ्या स्थानावर आहे. याचा अर्थ असा की, सध्या प्रणित आणि गौरव यांच्यात थेट लढत दिसत आहे.
फरहाना भट्ट १,४५,१४७ मतांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या मतदानाच्या आकडेवारीनुसार, तान्या मित्तल १,०४,१४३ मतांसह चौथ्या स्थानावर आहे, तर अमाल मलिक सर्वात कमी २८,४५० मतांसह पाचव्या स्थानावर आहे. हा ट्रेंड कायम राहिल्यास, यंदा प्रणित मोरे बिग बॉस १९ ची ट्रॉफी उचलण्याची दाट शक्यता आहे. आता अंतिम काही तासांत मतदानाची समीकरणे बदलतात की प्रणित मोरे ही आघाडी कायम ठेवतो, हे लवकरच स्पष्ट होईल.
