हळद लागली..! प्राजक्ता-शंभूराजच्या हळदी कार्यक्रमाचे फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 10:54 IST2025-12-02T10:28:58+5:302025-12-02T10:54:16+5:30
Prajakta Gaikwad: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आज लग्नानंतर खुटवड घराण्याची सून होणार आहे.

सध्या मराठी सिनेविश्वात लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. नुकताच बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे.

प्राजक्ता गायकवाडच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून नुकताच तिचा आणि शंभूराज खुडवडसोबत हळदीचा कार्यक्रम पार पडला. याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

प्राजक्ताने नुकतेच हळदी सोहळ्यातील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्राजक्ता गायकवाडने हळदीसाठी चटणी रंगाची ओढणी आणि पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर शंभुराजने व्हाइट रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता.

हातात हिरवा चुडा, पिवळ्या रंगाचा लेहंगा, फुलांची ज्वेलरी यात प्राजक्ता खुपच सुंदर दिसत होती.

फोटोत हळदी नंतर प्राजक्ता आणि शंभुराज नाचतानाही दिसत आहेत. त्यांचे फोटो पाहून त्यांनी खूप धमाल केल्याचं दिसत आहे.

प्राजक्ता आणि शंभुराजच्या हळदीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

प्राजक्ता आज लग्नानंतर खुटवड घराण्याची सून होणार आहे.

प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवड यांचा लग्नसोहळा येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.२४ वाजता संपन्न होणार आहे.

ऑगस्ट महिन्यात प्राजक्ता-शंभुराजचा साखरपुडा पार पडला होता. आता चाहते त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

प्राजक्ता-शंभुराज यांच्या हळदी समारंभाचे फोटो टेल्स ऑन टाइम या इंस्टाग्राम पेजवरून घेतले आहेत.

















