'सपने सुहाने लड़कपन के'मधील गुंजन अडकली लग्नबंधनात, अभिनेत्रीचा नवरा आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 15:02 IST2025-12-07T14:53:26+5:302025-12-07T15:02:39+5:30
हिंदी कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. सारा खाननंतर आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे.

'सपने सुहाने लडकपन के'मधील गुंजन अर्थात अभिनेत्री रुपल त्यागी काल ५ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रुपल त्यागीच्या लग्नाची चर्चा होती.

रुपल त्यागीनं मुंबईत एका खाजगी समारंभात लग्न केले. तिच्या लग्नाचे खास फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या समारंभात केवळ कुटुंब आणि जवळच्या मित्रांची उपस्थिती होती.

विशेष म्हणजे, रुपलने लग्नासाठी निवडलेले ठिकाण खूपच युनिक होते. ज्या हॉटेलमध्ये त्यांचे लग्न झाले ते मुंबई विमानतळाच्या अगदी जवळ आहे.

रुपलने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, पार्श्वभूमीत मुंबई विमानतळाची धावपट्टी आणि विमाने स्पष्ट दिसत आहेत. लग्नासाठीच्या या हटके ठिकाणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

रुपलच्या नवऱ्याचं नाव नोमिष असं आहे. तो अॅनिमेशन इंडस्ट्रीमध्ये काम करतो. रुपल आणि नोमिष यांनी लग्नासाठी आकर्षक लूक केला होता.

रुपलने पारंपरिक लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. सोनेरी मांग टिक्का, सोन्याचे दागिने आणि लाल-पांढऱ्या बांगड्यांमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.

रुपलने तिच्या लेहेंग्यावर 'रुपल' आणि 'नोमिश'च्या नावाचे 'रूनोम' (#Roonom) असा हॅशटॅग असलेला कमरबंद बांधला होता.

रुपल आणि नोमिषची भेट दोन वर्षांपूर्वी मुंबईत झाली होती. दरम्यान, येत्या ८ डिसेंबर रोजी रुपल आणि नोमिषचे रिसेप्शन आयोजित केले जाणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी नोमिषनं गुडघ्यावर बसून रुपलजवळ प्रेम व्यक्त केलं होतं. नोमिषने रुपलच्या बोटात अंगठी घातली आणि तिला फुलांचा गुच्छ देऊन प्रपोज केलं होतं.

. या खास क्षणाचे फोटो शेअर करताना रूपलने कॅप्शनमध्ये Forever Yes, असं लिहिलं. या खास प्रसंगी रूपल त्यागीने लाल रंगाचा हॉल्टर नेक ड्रेस परिधान केला होता.

















