प्राजक्ता गायकवाडने लग्नात परिधान केलेल्या मंगळसूत्राची चर्चा, काय आहे खास?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:44 IST
1 / 7प्राजक्ता गायकवाड ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताने आज शंभूराज खुटवडसोबत थाटामाटात लग्न केलं2 / 7प्राजक्ता आणि शंभूराजच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. प्राजक्ताने लग्नात परिधान केलेल्या मंगळसूत्राची खूप चर्चा आहे.3 / 7प्राजक्ताच्या समोर शंभूराज मंगळसूत्र घेऊन उभा होता. त्यावेळी नेटकऱ्यांंचं लक्ष प्राजक्ताच्या मंगळसूत्राकडे वेधलं4 / 7जाड्या मण्यांचं हे मंगळसूत्र खूप आकर्षक आहे. या मंगळसूत्राला 'गंठन' असेही म्हणतात. या मंगळसूत्राला दोन मोठ्या वाट्या असून त्या सोन्यांनी मढवलेल्या दिसत आहेत.5 / 7भटजींनी विधीनुसार हे मंगळसूत्र प्राजक्ताच्या समोर धरलं. पुढे शंभूराजने अभिनेत्रीच्या गळ्यात हे मंगळसूत्र घातलं. आकर्षक डिझाईन असलेलं प्राजक्ताचं हे मंगळसूत्र चर्चेत आहे6 / 7प्राजक्ता गायकवाडने आज शंभूराज खुटवडसोबत लग्न केलं. मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ताच्या खऱ्या आयुष्यातही शंभूराज आल्याने तिच्या चाहत्यांना आनंद झाला.7 / 7प्राजक्ता आणि शंभूराजच्या लग्नाची खूप चर्चा आहे. प्राजक्ताने नातेवाईक आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत थाटामाटात शंभूराजसोबत विवाह केला.