प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:08 IST
1 / 11 सध्या मराठी सिनेविश्वात लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. आज, २ डिसेंबर २०२५ रोजी 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाड हिचे आज शंभुराज खुटवडशी लग्न झाले.2 / 11पुण्यात हा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.3 / 11मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ताच्या खऱ्या आयुष्यातही शंभूराज आल्याने तिच्या चाहत्यांना आनंद झाला.4 / 11प्राजक्ताने तिच्या लग्नसोहळ्यासाठी हिरव्या रंगाची जरीचे काम असणारी साडी नेसली.5 / 11साडीवर मॅचिंग फिकट हिरव्या रंगाचा शेला आणि सोन्याचे सुंदर दागिने असा पारंपरिक लूक तिने केला होता. 6 / 11प्राजक्ताच्या मंगळसूत्रासह तिने परिधान केलेल्या ब्लाऊजने विशेष लक्ष वेधले. प्राजक्ताने तिच्या ब्लाऊजवर सप्तपदीची सात वचने लिहिली होती. 7 / 11 शंभुराने गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केली आहे. तसंच डोक्यावर फेटा बांधला आहे. त्यांच्या लग्नाचा अगदी राजेशाही थाट दिसत आहे. 8 / 11शंभूराज खुटवडच्या हटके आणि रुबाबदार लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.9 / 11लग्नसोहळ्यात परंपरेनुसार पार पडलेला एक खास विधी सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला. या विधीमध्ये प्राजक्ताच्या भावांनी नवरदेव शंभूराज दाजींचा कान पिळला. प्राजक्ताचे भाऊ जेव्हा हसत-हसत शंभूराज दाजींचा कान पिळत होते, तेव्हा संपूर्ण मंडपात एकच हशा पिकला.10 / 11टीव्हीवरची लाडकी येसूबाई आता खुटवड कुटुंबाची सून झाली आहे. प्राजक्ताचा नवरा शंभुराज खुटवड हा एक बिझनेसमन आहे.11 / 11प्राजक्ता आणि शंभुराजवर इंडस्ट्रीतून आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्राजक्ता-शंभुराज यांच्या लग्न समारंभाचे फोटो टेल्स ऑन टाइम या इंस्टाग्राम पेजवरून घेतले आहेत.