मराठी अभिनेत्रीचा समुद्रकिनारी बोल्ड लूक, लोकप्रिय मालिकेत करतेय काम; ओळखलंत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:17 IST
1 / 8सध्या सोशल मीडियावर हिंदीच नाही तर मराठी अभिनेत्रींचाही बोल्ड, ग्लॅमरस लूक दिसतो. यात अगदी टीव्ही अभिनेत्रीही मागे नाहीत.2 / 8कधी समुद्रकिनारी तर कधी स्वीमिंग पूलजवळ या मराठी अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. कोण आहे ही अभिनेत्री?3 / 8ही आहे सर्वांची लाडकी रुचिरा जाधव. रुचिरा सतत कुठे ना कुठे व्हेकेशनवर असते. तेथील तिच्या फोटोशूट्सची कायमच सोशल मीडियावर चर्चा होते.4 / 8काही दिवसांपासून ती भूतान टूरचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत होती. त्यातही तिचा स्टायलिश लूक पाहायला मिळाला.5 / 8तर आता तिच्या या बीच लूकने लक्ष वेधून घेतलं आहे. ब्लॅक शॉर्ट मोनोकॉनीमध्ये रुचिरा बोल्ड अवतारात दिसत आहे. यावर तिने मॅचिंग गॉगल लावला आहे.6 / 8सूर्यास्तावेळी आलेले तिचे हे फोटो पाहून चाहत्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या आहेत. रुचिरानेही या लूकमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.7 / 8या सगळ्यात रुचिराच्या फिटनेसचंही कौतुक होत आहे. तिने स्वत:ला प्रॉपर मेंटेन केलं आहे. वयाच्या ३६ व्या वर्षीही ती कमालीची सुंदर दिसत आहे8 / 8रुचिरा सध्या 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत लावण्या या भूमिकेत दिसत आहे. ही तिची ग्रे शेडेड व्यक्तिरेखा आहे. याआधी ती बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये दिसली होती.