Bigg Boss 19: 'जीके क्या करेगा, ट्रॉफी लेकर आयेगा!', महाविजेता गौरव खन्नाला प्राईज मनी म्हणून मिळाले 'इतके' रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 00:28 IST2025-12-08T00:20:13+5:302025-12-08T00:28:03+5:30

Bigg Boss 19: गौरव खन्नावर झाली बक्षीसांची बरसात, प्राईज मनी म्हणून मिळाले 'इतके' रुपये

टेलिव्हिजनवरील सर्वात वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. गेल्या काही दिवसांपासून या शोची आणि त्यातील स्पर्धकांची चांगलीच चर्चा होती.

बिग बॉस १९ च्या या पर्वाची यंदाची थीमही फार इंटरेस्टिंग होती.प्रेक्षकांचाही या पर्वाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

अशातच नुकताच या सीझनचा फिनाले पार पडला. २४ ऑक्टोबर रोजी सुरु झालेल्या पर्वाने प्रेक्षकांचं अगदी पुरेपूर मनोरंजन केलं.

या शोमध्ये १८ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी अमाल मलिक, गौरव खन्ना, प्रणित मोरे, फरहाना भट्ट आणि तान्या मित्तल या स्पर्धकांमध्ये कॉंटे की टक्कर पाहायला मिळाली.

दरम्यान, या पर्वाचा विजेता कोण ठरतोय, याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर या सगळ्यांना मागे टाकत टीव्हीवरील हॅण्डसम हंक गौरव खन्नाने या पर्वाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

यंदाच्या पर्वाची ट्रॉफी अभिनेता गौरव खन्नाने जिंकली असून त्याला यासोबत५० लाखांचा धनादेश बक्षीस स्वरुपात मिळाला आहे.

गौरवने चाहत्यांची मनं जिंकत तो या सीझनच्या ट्रॉफीचा खरा दावेदार ठरला आहे.