Join us
Daily Top 2Weekly Top 5

समांथाने 'भूत शुद्धी विवाह' विधीनुसार केलं लग्न; काय आहे ही प्राचीन योग पंरपरा? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 10:40 IST

1 / 7
अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि दिग्दर्शक राज निदिमोरु यांनी काल पारंपरिक थाटात साध्या पद्धतीने लग्न केलं. समांथा आणि राज यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली
2 / 7
या दोघांनी 'भूत शुद्धी विवाह' परंपरेनुसार लग्न केलं. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. काय आहे ही परंपरा? जाणून घ्या.
3 / 7
'भूत शुद्धी विवाह' ही एक प्राचीन योग परंपरा आहे. या परंपरेत लग्न करण्यापूर्वी वधू आणि वर यांच्या शरीरातील पाच मूलभूत तत्त्वे म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांची शुद्धी केली जाते.
4 / 7
'भूत शुद्धी विवाह' ही योगिक परंपरा जोडप्याला तात्त्विक आणि अध्यात्मिक स्तरावर एकमेकांशी खोलवर जोडण्यास मदत करते. पुढे लिंग भैरवी देवीच्या आशीर्वादाने हा विवाह संपन्न होतो.
5 / 7
'भूत शुद्धी विवाह' विधीमध्ये मंत्रांचे उच्चारण, पवित्र अग्नीला प्रदक्षिणा आणि इतर विशेष मंत्रांसह जोडप्याचा लग्नविधी पार पडला जातो. अशाप्रकारे समांथा आणि राज यांनी या पारंपरिक विवाहपद्धतीनुसार लग्न केलं.
6 / 7
समांथा आणि राज हे दोेघे अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. 'द फॅमिली मॅन २'च्या निमित्ताने समांथा आणि राज यांची ओळख झाली.
7 / 7
अखेर अनेक महिने एकमेकांना डेट केल्यानंतर कोणताही गाजावाजा न करता 'भूत शुद्धी विवाह' या पारंपरिक विधीच्या साहाय्याने या दोघांनी एकमेकांशी लग्न केलं.
टॅग्स :समांथा रुथ प्रभूबॉलिवूडTollywoodटिव्ही कलाकारटेलिव्हिजन