पती कुणालसोबत व्हेकेशनवर सोनाली कुलकर्णी, मोनोकिनीतील 'रेड हॉट' फोटोशूट केलं शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:38 IST2025-12-02T18:16:57+5:302025-12-02T18:38:25+5:30

'अप्सरा'चा हा नवा 'रेड हॉट' अवतार सोशल मीडियावर खूप व्हायरल झालाय.

मराठी सिनेसृष्टीतील लावण्यवती म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आलीये.

सोनाली सोशल मीडियावर किती ॲक्टिव्ह असते, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण यावेळी तिने शेअर केलेल्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

सोनाली कुलकर्णी पती कुणाल बेनोडेकर आणि कुटुबियांसोबत कर्जतमध्ये सुटी एन्जॉय करत आहेत.

येथील काही फोटो तिनं सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर देखील केले.

या फोटोंमध्ये सोनाली लाल रंगाच्या स्टायलिश मोनोकिनीमध्ये सुंदर दिसतेय.

हिरव्या रंगाचे ट्रेंडी सनग्लासेस परिधान करुन तिनं हटके पोझ दिल्या आहेत.

"खरंच ??? तुम्हाला कॅप्शन वाचायचे आहे का ???" असं तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं.

सोनालीने या लुकसाठी लाइट टोन मेकअप आणि साधी हेअरस्टाइल केली होती.

आउटफिटवर तिनं काहीच अक्सेसरीज घातल्या नव्हत्या. पण यामध्येही तिचे सौंदर्य खुलून दिसत आहे.