Join us

FAT TO FIT ! होय, हुमा कुरेशीला ओळखणेही झाले कठीण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 16:04 IST

अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या प्रचंड फिट दिसतेय. केवळ फिट नाही तर तिच्या फॅशन स्टेटमेंटमध्येही बराच बदल झाला आहे. हुमाचे ...

अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या प्रचंड फिट दिसतेय. केवळ फिट नाही तर तिच्या फॅशन स्टेटमेंटमध्येही बराच बदल झाला आहे. हुमाचे ताजे फोटो याचा पुरावा आहेत. आता इतका मोठा बदल आत्मसात करायचा म्हटल्यानंतर यामागे कष्ट तर आलेच. हुमाच्या सोशल अकाऊंटला तुम्ही भेट दिलीचं तर तुम्हाला हुमाची मेहनत स्पष्टपणे दिसेल. होय, हुमाने आपल्या सोशल अकाऊंटवर जिममधील वर्कआऊटचे बरेच व्हिडिओ शेअर केले आहेत. गेल्या २८ दिवसांत वजन घटवण्यासाठी हुमाने नाही नाही ते केले. योगा केला. २८ दिवस कडक डीटॉक्ट डाएट फॉलो केले. जिममध्ये घाम गाळला. आपला डाएट प्लानही हुमाने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे.साखर, सोडा आणि ग्लुटेन सारख्या वस्तूंचा हुमाने पूर्णपणे त्याग केला आणि याकाळात पूर्णपणे पौष्टिक आहार घेतला. हुमाच्या दिवसाची सुरूवात होते ती एक ग्लास कोमट पाणी,लिंबू व आल्याच्या रसाच्या मिश्रणाने. यानंतर दिवसभर हलका आहार आणि न्याहारी असा तिचा आखीव रेखीव आहार असतो.हुमा तिच्या वाढत्या वजनामुळे कायम टीकेची धनी ठरत आलीय. पण हुमाने कधीच या टीकेकडे लक्ष दिले नाही. पण काळासोबत बदल गरजेचा असतो. विशेषत: ग्लॅमर इंडस्ट्रीत टिकायचे तर हा बदल अतिआवश्यक ठरतो. हुमाने स्वत:ला बदलले आणि स्वत:चे फिगरही. ही बदललेली हुमा तुम्हाला कशी वाटतेय, ते सांगायला विसरू नका.ALSO READ : ​ नो रोमान्स विद रजनी!! हुमा कुरेशीला ‘या’ रोलने दिली हुलकावणी! हुमा आत्तापर्यंत ‘एक थी डायन’,‘लव शव ते चिकन खुराना’,‘बदलापूर’ आणि ‘जॉली एलएलबी2’ अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. लवकरच हुमा साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत ‘काला करिकलन’ या चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटात हुमा कुरेशीसोबत रोमान्स करताना दिसणार असल्याची बातमी आम्हीच तुम्हाला दिली होती. पण बातमीत थोडे ट्विस्ट आलेय. होय, रजनीकांतच्या ‘काला करिकलन’ या चित्रपटात हुमा आहे. पण ती या चित्रपटाची हिरोईन नाहीच. तामिळ इंडस्ट्रीत डेब्यू करणा-या हुमाला रजनीकांतच्या लीड अ‍ॅक्ट्रेसच्या रोलने हुलकावणी दिलीय. कारण या चित्रपटात रजनीकांतच्या ‘लव्ह इंटरेस्ट’चा रोल अभिनेत्री ईश्वरी राव करताना दिसणार आहे. हुमाचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पण ती रजनीकांतसोबत रोमान्स करताना दिसणार नाही. ती यात जरीना हे पात्र रंगवणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हुमा यात रजनीकांतची मदत करताना दिसणार आहे. नाना पाटेकर या चित्रपटात एका नेत्याच्या भूमिकेत आहे. या नेत्याशी लढताना जरीना रजनीकांतची मदत करणार आहे.