Join us

जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टला सेलिब्रिटींची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST

अलीकडेच गायक जस्टीन बिबर हा मुंबईत दाखल झाला होता. तो मुंबईत येणार म्हटल्यावर सर्व रसिकांसाठी पर्वणीच होती. मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर त्याची कॉन्सर्ट पार पडली. ‘बी टाऊन’ च्या वर्तुळातील अनेक सेलिब्रिटींनी या कॉन्सर्टला हजेरी लावली.

अलीकडेच गायक जस्टीन बिबर हा मुंबईत दाखल झाला होता. तो मुंबईत येणार म्हटल्यावर सर्व रसिकांसाठी पर्वणीच होती. मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर त्याची कॉन्सर्ट पार पडली. ‘बी टाऊन’ च्या वर्तुळातील अनेक सेलिब्रिटींनी या कॉन्सर्टला हजेरी लावली.कोरिओग्राफर रेमो डिसुझा हा येथे त्याच्या हटके अंदाजात आला होता.गायक आणि संगीतकार अन्नू कपूर त्याच्या फॅमिलीसहित या कॉन्सर्टला आला होता.या कॉन्सर्टला बोनी कपूर, पत्नी श्रीदेवी आणि मुलगी खुशी कपूर यांच्यासोबत आले होते.मलायका अरोरा खान आणि अरबाज खान हे त्यांच्या मुलांसोबत या कॉन्सर्टला आले होते.मलायकाची ही हॉट अदा तुम्हाला घायाळ करणारच!जस्टीन बिबर आणि आलिया भट्ट नाही असे कसे होईल? आलिया अत्यंत कुल लूकमध्ये येथे आली होती.अलीकडेच मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी उर्वषी रौतेला ही देखील या कॉन्सर्टला यायला विसरली नाही.रविना टंडन आणि तिची छोटी गर्ल गँग या कॉन्सर्टला कशा येणार नाहीत?हुमा ही जस्टीनची खुप मोठी फॅन आहे. ती एकदम त्या फॅनच्या लूकमध्ये येथे आली होती.सलमानची लाडकी बहीण अर्पिता, पती आयुष शर्मा आणि त्यांचा मुलगा अहिल हे देखील या कॉन्सर्टला आले होते.हॉट कपल बिपाशा बसु आणि पती करणसिंग ग्रोव्हर हे जस्टीन बीबरचे डायहार्ड फॅन असल्याने ते या कॉन्सर्टला येणं कसं काय विसरतील?