Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्वदच्या दशकातील 'गुड्डी' आठवतेय ना, जाणून घ्या सध्या ती काय करतेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:20 IST

1 / 8
हिंदी चित्रपटसृष्टीत विनोदी कलाकारांचे योगदान नेहमीच मोठे राहिले आहे. विशेषतः ९० च्या दशकात चाहत्यांना हसवण्याचे काम करणाऱ्या कलाकारांचे स्थान आजही खास आहे. याच कलाकारांपैकी एक लेडी अभिनेत्री म्हणजे गुड्डी मारुती (Guddi Maruti), जिला सिनेमाची गुड्डी म्हणूनही ओळखले जाते.
2 / 8
एक काळ असा होता जेव्हा ती मोठ्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री होती. पण आज ती कुठे गायब आहे आणि काय करत आहेत, याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
3 / 8
६४ वर्षीय गुड्डी मारुतीचा जन्म मुंबईतील बांद्रा येथे झाला. तिचे खरे नाव ताहिरा परब आहे आणि चित्रपटसृष्टीत त्या गुड्डी मारुती या नावाने ओळखली जाते.
4 / 8
९०च्या दशकात तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये साइड रोलमध्ये कॉमेडियनची भूमिका साकारून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या काळात तिने गोविंदा, जुही चावला आणि दिव्या भारती यांसारख्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली.
5 / 8
गुड्डी मारुतीच्या सध्याच्या स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, ती सध्या मुंबईत राहते आणि अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. आता गुड्डी मोठ्या पडद्यावर नव्हे, तर छोट्या पडद्यावर अभिनेत्री म्हणून काम करत आहे. याव्यतिरिक्त, ती अनुपम खेर यांच्या ओटीटी चित्रपट 'विजय ६९' मध्येही दिसली होती.
6 / 8
गुड्डी मारुती सध्या स्टार प्लसवरील 'उड़ने की आशा' मालिकेत काम करताना दिसत आहे आणि कलर्स टीव्ही चॅनेलवरील 'ज्यादा मत उड़' या मालिकेतही तिची झलक पाहायला मिळत आहे.
7 / 8
गुड्डी मारुतीने १९८० मध्ये आलेल्या 'सौ दिन सास के' या चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. या काळात तिने ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
8 / 8
तिने बेवफाई, नगीना, एलान-ए-जंग, निरसिम्हा, शोला और शबनम, चमत्कार, खिलाड़ी, आंटी नंबर १, दिल तेरा आशिक, बीवी नंबर १ या सिनेमात काम केलंय.