'३ इडियट्स'मधील 'साइलेन्सर' आठवतोय का? १५ वर्षांपूर्वी ब्लॉकबस्टर सिनेमातून प्रसिद्ध झाला होता ओमी वैद्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:08 IST2025-12-09T17:01:35+5:302025-12-09T17:08:37+5:30

'3 Idiots' fame Omi Vaidya : आमिर खानचा ३ इडियट्स हा एक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट आहे. या चित्रपटाला चाहत्यांनी खूप पसंत केले. या चित्रपटातील 'साइलेन्सर' हे पात्र देखील खूप गाजले होते. १५ वर्षांपूर्वी ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटातून प्रसिद्ध झालेला ओमी वैद्य सध्या काय करतो आहे, हे जाणून घेऊया.

आमिर खानचा ३ इडियट्स हा एक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट आहे. या चित्रपटाला चाहत्यांनी खूप पसंत केले. या चित्रपटातील 'साइलेन्सर' हे पात्र देखील खूप गाजले होते. १५ वर्षांपूर्वी ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटातून प्रसिद्ध झालेला ओमी वैद्य सध्या काय करतो आहे, हे जाणून घेऊया.

थ्री इडियट्सच्या सीक्वलच्या बातम्या आल्यापासून, या चित्रपटातील कलाकार पुन्हा चर्चेत आले आहेत. चित्रपटात आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते. पण या मोठ्या कलाकारांमध्ये एका अभिनेत्याची विशेष चर्चा झाली होती, त्याचं नाव आहे ओमी वैद्य.

ओमी वैद्यने '३ इडियट्स' चित्रपटात चतुर रामलिंगमची भूमिका केली होती, ज्याला चित्रपटात 'सायलेन्सर' म्हणून हाक मारली गेली. ३ इडियट्समधील 'साइलेन्सर'च्या भूमिकेने त्याला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. ओमीने ते पात्र अतिशय उत्कृष्टपणे साकारले होते.

ओमी वैद्यने त्याच्या करिअरची सुरुवात २००७ मध्ये केली होती. तो रोलिंग या चित्रपटात दिसला होता. ३ इडियट्स हा त्याचा दुसरा चित्रपट होता.

यानंतर तो २०११ मध्ये रिलीज झालेल्या दिल तो बच्चा है जीमध्ये 'मिलिंद केळकर'च्या भूमिकेत दिसला होता. त्याने देसी बॉईजमध्येही काम केले होते.

यानंतर तो प्लेयर्स आणि जोडी ब्रेकर्समध्ये झळकला होता. २०१५ मध्ये, अभिनेत्याने फॉर हिअर ऑर टू गो नावाचा एक इंडो-अमेरिकन चित्रपट केला, ज्यात त्याने 'लक्ष्मी'ची भूमिका साकारली होती.

२०१७ मध्ये तो मिरर गेममध्ये झळकला. २०१८ मध्ये त्याने ब्लॅकमेल आणि ऍस्ट्रो हे चित्रपट केले. त्यानंतर ओमी वैद्यने काही काळ ब्रेक घेतला होता. यानंतर तो २०२३ मध्ये अमेरिकन-बांगलादेशी चित्रपट एमआर-९: डू ऑर डायमध्ये दिसला होता

२०२४ साली तो एका मराठी चित्रपटात पाहायला मिळाला. ज्याचे नाव होतं आईच्या गावात मराठी बोल. या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यानेच केले होते. त्यानंतर तो कोणत्याच प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळाला नाही.