तगडा अभिनय तरीही 'धुरंधर'साठी अक्षय खन्नाला रणवीरपेक्षा खूपच कमी मानधन; मिळाले फक्त 'इतके' पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 16:51 IST2025-12-09T16:44:22+5:302025-12-09T16:51:11+5:30

'धुरंधर'च्या संपूर्ण स्टारकास्टचं मानधन समोर आलं आहे. कोणी किती पैसे घेतले याच्या मानधनाचा आकडा जाणून घेऊया.

Dhurandhar: सध्या जिकडे तिकडे फक्त 'धुरंधर' सिनेमाचीच चर्चा होताना दिसत आहे. सिनेमातील रणवीर सिंगच्या अभिनयासोबतच अक्षय खन्नाचं भरभरुन कौतुक होत आहे.

पण, रणवीर सिंगइतकाच तगडा अभिनय करूनदेखील अक्षय खन्नाला फारच कमी मानधन देण्यात आलं आहे.

'धुरंधर'च्या संपूर्ण स्टारकास्टचं मानधन समोर आलं आहे. कोणी किती पैसे घेतले याच्या मानधनाचा आकडा जाणून घेऊया.

'धुरंधर'मध्ये रणवीर सिंगने पाकिस्तानात जाऊन राहणाऱ्या भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे.

या भूमिकेसाठी त्याने ३०-५० कोटी इतकं मानधन घेतलं आहे. 'धुरंधर'मधील सगळ्या कलाकारांपेक्षा रणवीरच्या मानधनाचा आकडा मोठा आहे.

'धुरंधर'मध्ये आर माधवन अजय संन्याल यांच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी त्याने ९ कोटी इतकी फी घेतली आहे.

या सिनेमात संजय दत्तने पाकिस्तानी पोलीस ऑफिसर एसपी चौधरी अस्लम यांची भूमिका साकारली आहे. यासाठी त्याने १० कोटी मानधन घेतलं आहे.

अर्जुन रामपालने 'धुरंधर'मध्ये ISI ऑफिसर मेजर इक्बालची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने १ कोटी इतकं मानधन घेतलं आहे.

तर रणवीरची हिरोईन असलेली सारा अर्जुन 'धुरंधर'मध्ये मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे. तिने तिच्या भूमिकेसाठी १ कोटी फी घेतली आहे.

'धुरंधर'मध्ये रहमान डकैत हे पात्र अक्षय खन्नाने साकारलं आहे. पण, यासाठी त्याला फारच कमी मानधन मिळालं आहे.

अक्षय खन्नाला 'धुरंधर'साठी केवळ २.५ कोटी मानधन देण्यात आलं आहे.