Join us
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेत्याची मुलगी, सुपरहिट सिनेमांत केलंय काम, बिहार निवडणुकीत उतलेली प्रचाराच्या मैदानात; ओळखलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:48 IST

1 / 8
आजकाल अनेक कलाकार राजकारणात सक्रीय असतात, तर काहींना राजकारणात येण्याची इच्छा असते. सध्या देशभरात बिहार विधानसभा निवडणूकीची चर्चा आहे.
2 / 8
आज १४ नोव्हेंबरला या निवडणुकीच्या मतमोजणी सुरुवात झाली आहे. अशातच या दरम्यान,एक बॉलिवूड अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली.
3 / 8
अलिकडेच बॉलिवूडच्या ग्लॅमरपासून दूर बिहारच्या रस्त्यांवर ही अभिनेत्री प्रचार करताना दिसली. त्यामुळे तिची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली. या अभिनेत्रीचं नाव नेहा शर्मा आहे.
4 / 8
आपला अभिनय आणि सौंदर्यामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीचा एका राजकीय घराण्याशी संबंध आहे.
5 / 8
'क्रूक,'यमला पगला दीवाना २', 'तुम बिन २' तसेच 'तान्हाजी' अशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली.
6 / 8
नेहा शर्माचे वडील अजित शर्मा हे भागलपूर मतदारसंघातील कॉंग्रेसचे मात्तब्बर राजकारणी आहेत. गेली अनेक वर्ष ते भागलपूर विधानसभा मतदारसंघातून राजकारणात अनेक वर्षांपासून सक्रीय आहेत. अभिनेत्रीचे वडील यापूर्वी आमदार होते.
7 / 8
सध्या नेहाच्या या प्रचाराच्या रॅलीचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे तिची सोशल मीडियावर चर्चा रंगलीये.
8 / 8
नेहा शर्माचा जन्म २१ नोव्हेंबर १९८७ मध्ये बिहारमधील भागलपूर येथे झाला. तिचं शालेय शिक्षण माउंट कार्मेस स्कुल येथे झालं. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन अॅंड टेक्नॉलॉजी मध्ये तिने पदवीचं शिक्षण घेतलं. २००७ मध्ये चिरुथा या चित्रपटातून तिने तेलुगु सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर २०१० मध्ये क्रूक सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
टॅग्स :नेहा शर्माबॉलिवूडबिहार विधानसभा निवडणूक २०२५सेलिब्रिटी