१६७ कोटींच्या संपत्तीचा मालक! ५० व्या वर्षीही आहे सिंगल, खलनायक साकारून केलीय सगळ्यांची हवा टाईट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 14:29 IST2025-12-09T14:21:27+5:302025-12-09T14:29:10+5:30
५० व्या वर्षीही आहे सिंगल, खलनायक साकारून केलीय सगळ्यांची हवा टाईट! कोण आहे तो?


अभिनेता अक्षय खन्ना हा ९० च्या दशकातील आघाडीचा अभिनेता होता.सध्या अभिनेता धुरंधर चित्रपटामुळे चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे.

अक्षय खन्ना हा बॉलिवूड अभिनेता विनोद खन्ना यांचा मुलगा आहे. आपल्या वडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे नेत त्याने इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्याने 'हिमालय पुत्र' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर 'बॉर्डर', 'दिल चाहता है', 'ताल', 'हंगामा' यासारख्या चित्रपटांमुळे तो लोकप्रिय झाला.

दरम्यान, २०२५ हे वर्ष अक्षय खन्नासाठी अगदीच खास ठरलं आहे.विकी कौशलच्या छावा चित्रपटानंतर आता तो धुरंधर मुळे चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे.

दरम्यान, २०२५ हे वर्ष अक्षय खन्नासाठी अगदीच खास ठरलं आहे.विकी कौशलच्या छावा चित्रपटानंतर आता तो धुरंधर मुळे चांगलाच प्रसिद्धीझोतात आला आहे.

अक्षय खन्नाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर अभिनेता अद्याप अविवाहित आहे. त्याचं नाव अनेक बॉलीवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले असले तरी त्यांचे कोणाशीही नाते फार काळ टिकू शकले नाही.

कोट्यवधींचा मालक आहे हा अभिनेता
मिडिया रिपोर्टनुसार, अक्षय खन्नाची एकूण संपत्ती ₹१६७ कोटी आहे.त्याच्याकडे जुहू येथे समुद्रकिनारी असलेला बंगला आहे ज्याची किंमत साधारण ३.५ कोटी आहे. शिवाय मलबार हिलमध्ये त्याचा आलिशान बंगला आहे.

















