सौंदर्य तिचं आरस्पानी! बजरंगी भाईजान मधील 'मुन्नी' आता दिसते फारच देखणी, फोटोंवरुन नजर हटणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 17:15 IST
1 / 8 काही चित्रपट प्रदर्शित होऊन कितीही काळ लोटला तरी त्यांची क्रेझ कमी होत नाही. अशाच चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे बजरंगी भाईजान.2 / 8 सलमान खान व करिना कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. 3 / 8 हा चित्रपट प्रदर्शित होऊन १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केलंय. त्यावेळी बजरंगी भाईजान सिनेमा खूपच गाजला होता. 4 / 8 दरम्यान, या चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारून बालकलाकार हर्षाली मल्होत्रा भाव खाऊन गेली. या चित्रपटात तिने केलेल्या कामाचं सगळ्यांनी कौतुक केलं.5 / 8मुन्नी आता मोठी झाली आहे. शिवाय ती अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. 6 / 8 'बजरंगी भाईजान'फेम हर्षाली मल्होत्रा अलिकडेच 'अखंड २' या तेलुगू चित्रपटात झळकली. या चित्रपटात तिने नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली. 7 / 8 हर्षाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिच्या इन्स्टाग्रामवर तिने काही खास फोटो पोस्ट केले आहेत.8 / 8 हर्षाली आता खूपच सुंदर दिसते. तिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या पडतील.