सौंदर्य तिचं आरस्पानी! बजरंगी भाईजान मधील 'मुन्नी' आता दिसते फारच देखणी, फोटोंवरुन नजर हटणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 17:15 IST2025-12-02T16:58:03+5:302025-12-02T17:15:59+5:30
इतकी मोठी झाली बजरंगी भाईजान मधील मुन्नी! सौंदर्यावर चाहते भाळले; आता काय करते माहितीये?

काही चित्रपट प्रदर्शित होऊन कितीही काळ लोटला तरी त्यांची क्रेझ कमी होत नाही. अशाच चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे बजरंगी भाईजान.

सलमान खान व करिना कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता.

हा चित्रपट प्रदर्शित होऊन १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केलंय. त्यावेळी बजरंगी भाईजान सिनेमा खूपच गाजला होता.

दरम्यान, या चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारून बालकलाकार हर्षाली मल्होत्रा भाव खाऊन गेली. या चित्रपटात तिने केलेल्या कामाचं सगळ्यांनी कौतुक केलं.

मुन्नी आता मोठी झाली आहे. शिवाय ती अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.

'बजरंगी भाईजान'फेम हर्षाली मल्होत्रा अलिकडेच 'अखंड २' या तेलुगू चित्रपटात झळकली. या चित्रपटात तिने नंदमुरी बालकृष्ण यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली.

हर्षाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिच्या इन्स्टाग्रामवर तिने काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

हर्षाली आता खूपच सुंदर दिसते. तिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या पडतील.

















