बापरे! 'धुरंधर'च्या सेटवर ऑक्सिजन सिलेंडर आणायचा अक्षय खन्ना; कारण ऐकून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:44 IST2025-12-09T13:27:43+5:302025-12-09T13:44:29+5:30
अक्षय खन्ना 'धुरंधर' सिनेमाच्या सेटवर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन का जायचा? बातमी वाचा आणि जाणून घ्या

'धुरंधर' सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे. सिनेमातील सर्वच व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी प्रेम केलंय. पण जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे अक्षय खन्नाची

अक्षय खन्नाने 'धुरंधर' सिनेमात रहमान डकैत या खलनायकाची भूमिका साकारली आहे. निगेटिव्ह भूमिका साकारुनही अक्षयला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळतंय

अशातच 'धुरंधर' सिनेमात अक्षयने साकारलेल्या व्यक्तिरेखेविषयी इंटरेस्टिंग माहिती समोर येतेय. अक्षय खन्ना सिनेमाच्या सेटवर चक्क ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जायचा.

अक्षय खन्नाचं जे गाणं व्हायरल झालं आहे ते लडाखमध्ये शूट करण्यात आलं आहे. त्या ठिकाणी ऑक्सिजनची पातळी खूप कमी होती. त्यामुळे अक्षयला श्वास घ्यायला त्रास व्हायचा.

म्हणून अक्षय खन्ना एक छोटा ऑक्सिजन सिलेंडर सोबत ठेवायचा. जेणेकरुन त्याला श्वास घ्यायला मदत व्हायची. त्यामुळे शूटिंग नसेल तेव्हा अक्षय ऑक्सिजन सिलेंडरच्या साहाय्याने मास्क लावून सेटवर असायचा.

अशाप्रकारे ही खास गोष्ट समोर आली आहे. स्वतःला कितीही त्रास होत असला तरी अक्षयने 'धुरंधर' मधील गाण्यावर डान्स परफॉर्मन्स करुन सर्वांना चकीत केलं

अक्षय खन्ना 'धुरंधर'नंतर आता आगामी सिनेमात असूरगुरु शुक्राचार्यंच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे 'महाकाली' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे

















