Join us

आयुषमान-परिणीतीच्या सिंगिंगचा जलवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST

‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरू आहे. अलीकडेच त्यांनी मुंबईत त्यांच्या गायकीच्या परफॉर्मन्सेसनी स्टेजवर आग लावली. धम्माल गाणी, सादरीकरण आणि दोघांच्याही लटक्याझटक्यांनी चाहत्यांना घायाळ केले.

‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरू आहे. अलीकडेच त्यांनी मुंबईत त्यांच्या गायकीच्या परफॉर्मन्सेसनी स्टेजवर आग लावली. धम्माल गाणी, सादरीकरण आणि दोघांच्याही लटक्याझटक्यांनी चाहत्यांना घायाळ केले.हॅण्डसम आयुषमान खुराणा याने अशा रॉयल लुकमध्ये या इव्हेंटला एन्ट्री घेतली.कुणालाही सहज एका नजरेत घायाळ करेल असाच ग्लॅमरस अंदाज परिणीती चोप्राचा होता.एखाद्या क्यूट कपलची व्याख्या समजून घ्यायची असेल तर आयुषमान-परिणीती यांच्याकडे पाहा...गाणी सादर करताना मध्येच आयुषमानला काय वाटले कुणास ठाऊक? पण त्याने परिणीती चोप्राच्या गालावर किस केला. त्यावेळी परिणीतीचे हावभाव पाहा किती नॉटी दिसतेय ती!परफॉर्म करत असताना आयुषमान-परिणीती यांचा रोमँटिक अंदाज पाहाण्यासारखा होता.जिथे परिणीती असेल तिथे ही सगळी धम्माल, मस्ती अपेक्षित आहे. परफॉर्म करताना मध्येच दोघेही डान्स करू लागले.धम्माल, मजा एकीकडे आणि खरी गायकी एकीकडे. अतिशय लक्षपूर्वक आणि आत्मियतेने आयुषमान गायन सादर करत होता.परिणीती एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण एक गायिकाही आहे. तिने मेरी प्यारी बिंदू साठीही गाणं गायलं आहे. गाणं परफॉर्म करताना तिची ही मनमोहक अदा.गाणे सादर करता करता आयुषमानने मध्येच परिणीतीला मिठी मारली.आयुषमान-परिणीती हे प्रथमच एकमेकांसोबत काम करत असून त्यांची केमिस्ट्री सर्वांनाच भावते आहे. परफॉर्मन्स करताना नकळत परिणीतीने आयुषमानच्या खांद्यावर डोके टेकवले.आयुषमान तिच्याकडे बघून गात असताना परिणीतीने तिच्या खोडकर स्वभावानुसार अशी पोझ दिली.गाणं म्हणत असताना केवळ गाऊन ते थांबले नाही तर ते म्हणत असताना प्रेक्षकांनाही त्यांनी नाचायला लावले. तेव्हा त्यांची ही क्यूट अदा.