Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृतीसोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 15:15 IST

1 / 11
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत अनेक दिवसांपासून सस्पेन्स कायम होता. मात्र आता स्मृती आणि पलाश या दोघांनीही लग्नाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
2 / 11
स्मृती आणि पलाश यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये ते आता लग्न करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ते दोघेही आपल्या आयुष्यात पुढे जाऊ इच्छितात. त्यांचं लग्न मोडल्याची बातमी चाहत्यांसाठी एक मोठा धक्का आहे.
3 / 11
स्मृतीनंतर आता पलाशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने स्मृतीसोबत लग्न करणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्याने म्हटलं की, त्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि गेले काही दिवस त्याच्यासाठी खूप कठीण होते.
4 / 11
पलाशने त्याच्यावर आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. 'मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या पर्सनल रिलेशनशिपपासून मागे हटत आहे.
5 / 11
'लोक कोणत्याही आधाराशिवाय इतक्या सहजपणे टीका करत आहेत हे पाहणे माझ्यासाठी खूप अवघड आहे. माझ्या आयुष्यातील हा सर्वात कठीण काळ आहे आणि मी माझ्या विश्वासांवर ठाम राहून ते ग्रेसफुली हाताळेन.'
6 / 11
'मला मनापासून आशा आहे की आपण, एक समाज म्हणून, कोणत्याही आधार नसलेल्या अफवांवर आधारित कोणाचाही न्याय करण्यापूर्वी थोडं थांबायला शिकू.
7 / 11
'आपले शब्द कधीकधी अशा जखमा निर्माण करू शकतात ज्यांची आपण कल्पनाही करू शकत नाही. आम्ही या बाबींवर विचार करत असताना, जगभरातील अनेक लोकांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागत आहे.'
8 / 11
'माझी टीम खोटी आणि बदनामीकारक माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करेल. या कठीण काळात पुढे येऊन माझ्यासोबत उभं राहणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो' असं पलाश मुच्छलने म्हटलं आहे.
9 / 11
स्मृती मानधनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केलेल्या एका स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. स्टोरीमध्ये आता तिचं लग्न रद्द झाल्याची माहिती दिली आहे.
10 / 11
'गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत आणि मला वाटतं की यावेळी मी याबद्दल बोलणं महत्त्वाचं आहे. मी एक अतिशय प्रायव्हेट पर्सन आहे आणि मी ते असंच ठेवू इच्छिते, परंतु मला हे स्पष्ट करायचं आहे की माझं लग्न रद्द करण्यात आलं आहे.”
11 / 11
“मला हे संपूर्ण प्रकरण इथेच संपवायचं आहे आणि तुम्हा सर्वांनाही तसंच करण्याची विनंती करते. मी तुम्हाला विनंती करते की, कृपया यावेळी दोन्ही कुटुंबांच्या प्रायव्हसीचा आदर करा आणि आम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ द्या' असं स्मृतीने स्टोरीमध्ये म्हटलं आहे.
टॅग्स :स्मृती मानधनालग्नशुभविवाहबॉलिवूड