30 एप्रिलला रिलीज होणार पीकू
By Admin | Updated: June 25, 2014 00:38 IST2014-06-25T00:38:05+5:302014-06-25T00:38:05+5:30
दिग्दर्शक शुजीत सरकारचा ‘पीकू’ हा नवा चित्रपट पुढील वर्षी 3क् एप्रिलला रिलीज होणार आहे.

30 एप्रिलला रिलीज होणार पीकू
>दिग्दर्शक शुजीत सरकारचा ‘पीकू’ हा नवा चित्रपट पुढील वर्षी 3क् एप्रिलला रिलीज होणार आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि इरफान खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण ऑगस्ट महिन्यात सुरू केले जाणार आहे. शुजीतच्या ‘शुबाईट’ या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांनी काम केले आहे. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित होऊ शकला नाही, तसेच त्याच्या ‘युद्ध’ या टीव्ही मालिकेतही ते दिसणार आहेत. शुजीत या चित्रपटातील कलाकारांच्या चांगल्या कामाबद्दल आशावादी आहे. तो म्हणाला, ‘मिस्टर बच्चन यांची जादू, दीपिकाचा सहज अभिनय, इरफानची बहुआयामी प्रतिभा आणि सदाबहार मौसमी चॅटर्जी यांच्यामुळे पीकू माङयासाठी एक यादगार अनुभव असेल. मी या कलाकारांच्या कामाबद्दल आशावादी आहे.’