स्वप्निल जोशी निघाला लंडनला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 16:46 IST2017-03-24T11:16:23+5:302017-03-24T16:46:23+5:30
स्वामी तिन्ही जगाचा.. 'भिकारी' या आगामी सिनेमाचा मुहुर्त काही दिवसांपूर्वी पार पडला होता. या मुहुर्ताला बिग बी अमिताभ बच्चन ...

स्वप्निल जोशी निघाला लंडनला
स वामी तिन्ही जगाचा.. 'भिकारी' या आगामी सिनेमाचा मुहुर्त काही दिवसांपूर्वी पार पडला होता. या मुहुर्ताला बिग बी अमिताभ बच्चन उपस्थित होते. बॉलिवूडचा कोरिओग्रफर आणि दिग्दर्शक गणेश आचार्यने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून याआधी गणेशने बॉलिवूडमधले चित्रपट दिग्दर्शित केले होते. आता तो 'स्वामी तिन्ही जगाचा.. भिकारी' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवतोय. या चित्रपटाची कथा ही खूप चांगली असून या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या कथेसोबत या चित्रपटाच्या गाण्यांचीदेखील चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात सुखविंदर सिंग हे गाणे गाणार आहेत. आई आणि मुलाच्या हळव्या नात्यावर भाष्य करणारा भावनिक विषय या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून मित्र असलेले गणेश आचार्य आणि शरद देवराम शेलार यांनी मी मराठा फिल्म प्रोडक्शनची स्थापना करून चित्रपट निर्मिती मध्ये पाऊल टाकले आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, रुचा इनामदार, गुरू ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, कीर्ती आडारकर, सुनील पाल आणि प्रदीप काब्रा अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
या चित्रपटातील काही गाण्यांचे आता लंडनमध्ये चित्रीकरण होणार आहे आणि या चित्रीकरणासाठी स्वप्निल जोशी लवकरच लंडनला रवाना होणार आहे. स्वप्निल या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आठ दिवसांसाठी लंडनला जाणार आहे. याविषयी स्वप्निल सांगतो, "मी या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला लवकरच जात असून तिथे आम्ही दोन गाण्यांचे चित्रीकरण करणार आहोत. या चित्रपटात रुचा माझ्यासोबत प्रमुख भूमिकेत असून ही दोन्ही गाणी माझ्यावर आणि रुचावर चित्रीत होणार आहेत."