Video: 'धुरंधर'मधल्या व्हायरल FA9LA गाण्यावर सिद्धूने बनवला रील, स्वॅग असा की अक्षय खन्नाही फिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:19 IST2025-12-09T17:18:44+5:302025-12-09T17:19:15+5:30
धुरंधर सिनेमातील FA9LA या गाण्याची भुरळ मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवलाही पडली आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या सिद्धूने FA9LA या गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे.

Video: 'धुरंधर'मधल्या व्हायरल FA9LA गाण्यावर सिद्धूने बनवला रील, स्वॅग असा की अक्षय खन्नाही फिका
रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाने प्रदर्शित होताच धुमाकूळ घातला आहे. फक्त बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर सोशल मीडियावरही 'धुरंधर'ची चर्चा होत आहे. या सिनेमातील काही सीन्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर अक्षय खन्नाच्या 'धुरंधर' सिनेमातील FA9LA या गाण्यालाही पसंती मिळाली आहे. या गाण्यावरचे रील्स तुफान व्हायरल झाले आहेत.
धुरंधर सिनेमातील FA9LA या गाण्याची भुरळ मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवलाही पडली आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या सिद्धूने FA9LA या गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओत शेरवानी सूटमध्ये सिद्धू एन्ट्री घेताना दिसत आहे. त्याच्या स्वॅगपुढे अक्षय खन्नाही फिका पडला, अशी चर्चा चाहत्यांमध्ये आहे. सिद्धूने FA9LA गाण्यावर बनवलेला हा रील व्हिडीओ व्हायरल झाला असून चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
रणवीर सिंग, आर माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन अशी 'धुरंधर' सिनेमाची स्टारकास्ट आहे. आदित्य धरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ५ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर'ने चारच दिवसांत १०० कोटींचा गल्ला पार केला आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने १२६.८८ कोटी कमावले आहेत.